rohit sharma statement  twitter
Sports

Rohit Sharma Statement: विजयाचा षटकार मारूनही रोहित शर्मा या कारणामुळे नाराज! सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

India vs England, World Cup: या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Statement:

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने इंग्लंडवर जोरदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने १०० धावांनी विजय मिळवला. प्रथम फालंदाजी करताना भारतीय संघाने २२९ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १२९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना जिंकून देण्यात भारतीय गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान हा सामना झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, ' हा एक असा सामना होता ज्यात सर्वांनीच सर्वोत्तम खेळ करत मोलाचं योगदान दिलं. आमच्या संघातील वरिष्ठ खेळाडूंनी योग्यवेळी उत्तम अप्रतिम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. सुरुवातीच्या ५ सामन्यांमध्ये आम्ही धावांचा पाठलाग केला. या सामन्यात आम्हाला धावांचा बचाव करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण जात होतं. विरोधी संघातील गोलंदाजांनी देखील अप्रतिम गोलंदाजी केली. '

भारतीय फलंदाजीबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' आम्ही फलंदाजीत दमदार कामगिरी करू शकलो नाही. सुरुवातीचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतले. संघ जेव्हा अशा स्थितीत फसतो तेव्हा एका मोठ्या भागीदारीची गरज असते. आम्हाला त्यात यश आलं. जेव्हा आमचा डाव संपला तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की, आम्ही ३० धावा कमी केल्या आहेत.' (Latest sports updates)

वेगवान गोलंदाजांच केलं कौतुक..

भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांबाबत बोलताना तो म्हणाला की, ' असे गोलंदाज तुम्हाला दररोज पाहायला मिळत नाही. जेव्हा डाव सुरू होतो तेव्हा तुम्हाला वेगवान गोलंदाजांकडून अशी अपेक्षा असते की, त्यांनी विकेट्स काढून द्यावं. आमच्या गोलंदाजांकडे अनुभव आहे आणि ती क्षमता आहे. फक्त त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. आज त्यांनी अशीच काही कामगिरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT