भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत २९ वा सामना लखनऊच्या मैदानावर सुरू आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम टीम इंडियाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघासाठी हे आमंत्रण घातक ठरलं. टीम इंडियाने इंग्लंडसमोर २३० धावांचे लक्ष्य ठेवलं. याच दरम्यान हिटमॅनने सर्वाधिक ८७ धावा केल्या. (Latest News)
रोहितची फलंदाजीचं कौतुक क्रिकेट समालोचक गौतम गंभीरनेही केलं. पण त्याचबरोबर त्याने विराट कोहलीला टोला मारला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील शीतयुद्ध सर्वांना माहितीये. गंभीर नेहमीच कोहलीला कोपरखळी मारत असतो. यावेळीही गंभीरने तेच केलं. रोहितचं कौतुक करत त्याने अप्रत्यक्षपणे विराटला स्वार्थी म्हटलंय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकात २२९ धावा केल्या. यादरम्यान रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली, तर सूर्यकुमार यादवनेही ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शुबमन गिल १३ चेंडूंमध्ये अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. तर संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली या सामन्यात खातं ही खोलू शकलेला नाही.
संघ संकटात असताना कर्णधार रोहित शर्माने फटकेबाजी करत ८७ धावा जोडल्या. त्यानंतर त्याची विकेट गेली. संघासाठी रोहितची खेळी पाहून गौतम गंभीरने त्याचं कौतुक केलं. रोहित शर्मा हा निस्वार्थी आहे. जर तो त्याच्यासाठी खेळला असता तर त्याने आतापर्यंत ४० ते ४५ अर्धशतकं झळकावली असती, अशा शब्दात गंभीरने त्याचं कौतुक केलं.
का मारला टोमणा
या सामन्यात फलंदाजी करताना न्यूझीलंडने टीम इंडियासमोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या आव्हानाचं पाठलाग करताना रोहित आणि गिलने शानदार सुरुवात केली. पहिली विकेट गेल्यानंतर विराट कोहली मैदानावर उतरला या सामन्यातही त्याने आक्रमक खेळी केली आणि आपला चेसरचं रुप दाखवलं. परंतु एका चुकीमुळे विराट कोहली पुन्हा एकदा टीकेचा धनी झाला होता. या सामन्यात के एल राहुलची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला होता.
सूर्यकुमारने सॅंटनरच्या फिरकी चेंडूवर ऑफ साईडवर फटका मारला आणि धाव घेतली. त्यावेळी दुसऱ्या टोकाकडून विराट कोहली होता. त्यावेळी तो ८० धावांवर होता. सूर्याने फटका मारल्यानंतर त्याने विराटला धाव घेण्यासाठी कॉल दिला. त्यावेळी विराट क्रिझ सोडून अर्धा खेळपट्टीवर आला. तर सूर्यकुमार हा चेंडूकडे पाहत धावा घेत होता. याचदरम्यान विराटने अर्ध्या क्रिझवर आल्यानंतर सूर्याला मागे फिरण्यास सांगितले.
परंतु सूर्यकुमारचं लक्ष मारलेल्या फटक्याकडे होते. तो विराटच्या कॉल बघू शकला नाही. परिणामी तो धावबाद झाला. यावरून विराट कोहली टीकेच्या धनी बनला. त्याने आपल्या शतकासाठी मागे फिरला आणि सूर्यकुमारला बाद केलं अशी टीका केली. त्यावरून गौतम गंभीरने त्याला टोमणा मारलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.