rohit sharma twitter
Sports

IND vs IRE: भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहितच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! स्वत:च केला मोठा खुलासा

Rohit Sharma Injury Update: भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये सुरू आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आयर्लंड संघाचा अवघ्या ९६ धावांवर फडशा पाडला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १२.२ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने ५२ धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान फलंदाजी करत असताना तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. या सामन्यानंतर त्याच्या दुखपतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

हा सामना न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर पार पडला. या सामन्यात चेंडू कधी उसळी घेत होता, तर कधी खालीच राहत होता. त्यामुळे फलंदाजी करत असताना आयर्लंडचा गोलंदाज जोशूआ लिटिलचा एक चेंडू रोहितला दुखापतग्रस्त करून गेला . त्यानंतर फिजिओ मैदानात आले आणि रोहितला मैदानाबाहेर घेऊन गेले. मात्र सामन्यानंतर त्याने ही दुखापत गंभीर नसल्याचं सांगितलं आहे. भारतीय संघाचा पुढील सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान रोहित शर्मा फिट आहे, ही भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी सकारात्मक बाब आहे. (Rohit Sharma Injury Update)

न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर अनेक दिग्गज खेळाडूंनी टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान रोहित शर्माला या खेळपट्टीबाबत प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, ' ५ महिने जुन्या असलेल्या खेळपट्टीचा अंदाज लावणं जरा कठीण आहे. मला असं वाटतं दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल झाली होती. गोलंदाजांसाठी खूप मदत उपलब्ध आहे. फक्त त्यांनी अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT