Rohit Sharma Record: हिटमॅनकडे इतिहास रचण्याची संधी! पहिल्याच सामन्यात ३ मोठे रेकॉर्ड्स रडारवर

India vs Ireland, T20 World Cup 2024: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पहिल्याच सामन्यात ३ मोठे रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.
Rohit Sharma Record: हिटमॅनकडे इतिहास रचण्याची संधी! पहिल्याच सामन्यात ३ मोठे रेकॉर्ड्स रडारवर
rohit sharmatwitter
Published On

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना नासाऊ काऊंटी क्रिकेटच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्नविश्वास वाढलेला असणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला ३ मोठे रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

रोहितला ४ हजारी बनण्याची संधी

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३९७४ धावा केल्या आहेत. त्याला टी-२० क्रिकेटमध्ये ४००० धावा करण्याची संधी असणार आहे. हा रेकॉर्ड करण्यासाठी त्याला अवघ्या २६ धावा करायच्या आहेत. टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ४०३७ धावा केल्या आहेत. तर ४०२३ धावा करणारा बाबर आझम दुसऱ्या स्थानी आहे.

Rohit Sharma Record: हिटमॅनकडे इतिहास रचण्याची संधी! पहिल्याच सामन्यात ३ मोठे रेकॉर्ड्स रडारवर
T20 WC IND vs IRE, Weather: भारत- आयर्लंड सामना पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान

२०० षटकार मारण्याचा रेकॉर्ड

रोहित शर्मा हा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात १० षटकार खेचताच त्याला २०० षटकार पूर्ण करण्याची संधी असणार आहे. रोहितने आतापर्यंत १९० षटकार खेचले आहेत. सर्वाधिक षटकार मारण्याची नोंद ही रोहितच्याच नावे आहे.

Rohit Sharma Record: हिटमॅनकडे इतिहास रचण्याची संधी! पहिल्याच सामन्यात ३ मोठे रेकॉर्ड्स रडारवर
India Tour Of Ireland: वेस्ट इंडिजनंतर टीम इंडिया करणार आयर्लंड दौरा! इथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

वर्ल्डकप स्पर्धेत १ हजार धावा

रोहित शर्मासाठी ही स्पर्धा अतिशय खास असणार आहे. कारण २००७ पासून ते आतापर्यंत झालेल्या सर्व टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहितला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत ९६३ धावा केल्या आहेत. जर त्याने या सामन्यात २७ धावा केल्या. तर तो १००० धावा करणारा तिसरा फलंदाज ठरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com