Rohit Sharma Loses 20 Kg Weight saam tv
Sports

Rohit Sharma: भावा, एकदम कडक! रोहित शर्मानं घटवलं तब्बल २० किलो वजन, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

Rohit Sharma Loses 20 Kg Weight: रोहित शर्मा याने फिटनेससाठी केलेली ही मेहनत खरोखरच प्रेरणादायी आहे. अनेक वर्षांपासून रोहितच्या वजनावर नेहमीच चर्चा होत राहिली. पण आता त्याने या सर्व चर्चांना आपल्या फिटनेसने उत्तर दिले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांत त्याने आपल्या फिटनेसवर भरपूर मेहनत घेतली असून जवळपास २० किलो वजन कमी केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला.

विशेष म्हणजे वजन कमी केल्यानंतर त्याने बीसीसीआयची नवी फिटनेस टेस्ट ब्रॉन्को टेस्ट उत्तीर्ण केली आहे. मुळात ही टेस्ट पास करणं अवघड मानलं जातं, परंतु रोहितने ती सहज पूर्ण करून सर्वांना प्रभावित केलंय. यामुळे रोहित टीम इंडियासाठी खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रोहित शर्मा आणि फिटनेसवरील ट्रोलिंग

काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मा आपल्या फिटनेसवरून प्रचंड ट्रोल झाला होता. एका वेळी एअरपोर्टवर दिसलेल्या त्याचा पोटाचा घेर वाढल्यामुळे चाहत्यांनी त्याला चांगलंच सुनावलं होतं. त्याच्या ‘बेली फॅट’मुळे लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते की, तो २०२७ च्या वनडे वर्ल्डकपसाठी तंदुरुस्त राहील का? अशा शंका उपस्थित झाल्यानंतर रोहितने मेहनतीने वजन कमी करून आणि ब्रॉन्को टेस्ट उत्तीर्ण करून टीकाकारांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे तो केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही आगामी सामन्यांसाठी सज्ज असल्याचं स्पष्ट झालं.

ब्रॉन्को टेस्ट म्हणजे काय?

ब्रॉन्को टेस्ट हा एक एरोबिक एंड्युरन्स टेस्ट आहे. जी बीसीसीआयने क्रिकेटपटूंच्या फिटनेससाठी अनिवार्य केली आहे. या चाचणीत खेळाडूंना विश्रांती न घेता ठराविक अंतर सतत पळावं लागते. सर्वप्रथम २० मीटर धावून परत यायचं, मग ४० मीटर धावून परत यायचं आणि त्यानंतर ६० मीटर धावून परत यायचं असतं.

हा क्रम एक सेट मानला जातो आणि खेळाडूंना सलग ५ सेट ठराविक वेळेत पूर्ण करणं बंधनकारक असतं. या कठीण चाचणीत यशस्वी होणं म्हणजे खेळाडूचा स्टॅमिना आणि फिटनेस उत्तम असल्याचं प्रमाणपत्रच असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chameleon: सरडा एका दिवसात किती वेळा रंग बदलतो?

Today Horoscope : नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात मिळणार यश; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Maharashtra Live News Update: यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही टीडब्ल्यूजेच्या चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Face Care Tips: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी सकाळी उठल्यावर चेहरा या घरातील सामग्रीने करा स्वच्छ, आठवड्याभरात दिसेल फरक

Cricket Shocking : क्रिकेट विश्वाला मोठा धक्का; टीम इंडियाच्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT