नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

Surabhi Jayashree Jagdish

लोखंडी कढई

लोखंडी कढई नवी असो किंवा जुनी, योग्य काळजी न घेतल्यास तिच्यावर चिकटपणा येतो आणि पदार्थ तव्याला चिकटतात. काही घरगुती, पारंपरिक उपाय केल्यास लोखंडी कढई पुन्हा नॉन-स्टिकसारखी वापरता येते.

वापराआधी कढई थोडं तापवा

भाजी टाकण्यापूर्वी कढई थोडी गरम करा. मग तेल घालून ते तापू द्या. यामुळे पदार्थ तव्याला चिकटत नाहीत.

कांदा किंवा बटाटा परतणं

कढईत थोडं तेल घेऊन कापलेला कांदा किंवा बटाटा परतावा. भाजी काढून टाकल्यानंतर कढई पुसून ठेवा. यामुळे नैसर्गिक नॉन-स्टिक थर तयार होतो.

गरम पाण्याने धुणे

स्वयंपाकानंतर कढई पूर्ण थंड होऊ देऊ नका. कोमट किंवा गरम पाण्यानेच हलक्या हाताने धुवा.थंड पाणी वापरल्यास चिकटपणा वाढतो.

साबण टाळा

लोखंडी कढईला वारंवार साबण लावू नये. साबणामुळे तयार झालेला तेलाचा थर निघून जातो. यामुळे कढई पुन्हा चिकट होते.

पूर्ण वाळवून ठेवा

धुतल्यानंतर कढई गॅसवर क्षणभर तापवून वाळवा. ओलसर ठेवली तर गंज आणि चिकटपणा वाढतो. कोरडी कढई जास्त काळ चांगली राहते.

मीठ घालून तापवणं

कढईत जाड मीठ घालून मध्यम आचेवर 5–7 मिनिटं तापवा. मीठ काळंसर झाल्यावर कढई थंड करून कोरड्या कापडाने पुसा. यामुळे चिकट थर निघून जातो.

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा