Shreya Maskar
स्ट्रीट स्टाइल सँडविच आपल्याला खूप आवडते. विशेषता 'हिरवी चटणी' आपण मागून मागून खातो. हीच चटणी घरी कशी बनवावी, जाणून घेऊयात
हिरवी चटणी बनवण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, चणा डाळ, आल्याचा तुकडा, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
हिरवी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, भाजून घेतलेली चणा डाळ, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि पाणी टाकून एक पेस्ट बनवा.
हिरवी चटणी जास्त घट्ट आणि जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात लिंबाचा रस पिळा.
शेवटी चटणीमध्ये चवीनुसार मीठ आणि साखरेचे काही दाणे टाका. यामुळे तिखट चटणीला थोडा गोडपणा येईल.
तयार हिरवी चटणी १५ दिवस तु्म्ही हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. चटणी बनवताना सर्व ताजे पदार्थ वापरा.
हिरव्या चटणीसोबत भेळ, सँडविच, वडापाव, समोसा, कचोरी, इडली, डोसा हे पदार्थ तुम्ही चवीने खाऊ शकता.
हिरवी चटणीमध्ये तुम्ही थोडा शेंगदाण्याचा कूट टाकू शकता. चटणी जास्त तिखट करू नका. जेणेकरून सर्वजण आनंदाने खातील.