Shreya Maskar
मुलांना सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तसेच झटपट रव्याची खीर बनवा. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.
घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून तुम्ही रव्याची खीर झटपट बनवाल. तसेच तुम्ही खीर थंड खायची असेल तर तयार झाल्यावर फ्रिजमध्ये 1-2 तास ठेवा.
रव्याची खीर बनवण्यासाठी दूध, साखर, रवा, केशर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स आणि किशमिश इत्यादी साहित्य लागते.
रव्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून रवा हलका गोल्डन फ्राय करून घ्या. रवा भाजताना तो मंद आचेवर ठेवा.
त्यानंतर यात दूध घालून एक उकळी काढून घ्या. नंतर साखर, केशर, वेलची पूड आणि किशमिश घालून मिक्स करा.
५-१० मिनिटांत राव्याची खीर तयार झाली. तुम्ही यात ड्रायफ्रूट्रसचे काप टाकू शकता. ज्यामुळे खीर अजून हेल्दी बनेल.
रव्याच्या खीरला रंग येण्यासाठी तुम्ही यात केशर देखील टाकू शकता. तुम्ही खीर जास्त घट्ट आणि पातळ करू नका.
तसेच कच्चे शेंगदाणे देखील रव्याच्या खीरीची चव वाढवतो. तसेच हा पदार्थ अवघ्या 5-10 मिनिटांत तयार होतो.