Shreya Maskar
ऑफिसवरून आल्यावर संध्याकाळचा नाश्ता म्हणून मसाला सँडविच पाव बनवा. सिंपल रेसिपी आताच नोट करा.
मसाला सँडविच पाव बनवण्यासाठी काकडी, शिमला मिरची , टोमॅटो, कांदा , बीट , लाल सुक्या मिरच्या , लसूण , मीठ, धने पावडर, बटर, पाव भाजी मसाला, कोथिंबीर, चाट मसाला इत्यादी साहित्य लागते.
मसाला सँडविच पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बीट गोलाकार बारीक आकारात कापून घ्या.
गरम पाण्यात लाल सुक्या मिरच्या घालून उकळवून घ्या. यामुळे लाल सुक्या मिरचीला चांगली चव लागते.
मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या, लसूण , मीठ घालून बारीक जाडसर पेस्ट तयार करा.
पॅनमध्ये बटर टाकून दोन्ही बाजूंनी पाव भाजून घ्या. यात पाव भाजी मसाला आणि लाल मिरच्यांची पेस्ट मिक्स करा. मसाला संपूर्ण पावाला लागेल याची काळजी घ्या.
बटरमध्ये पाव चांगले मिक्स करून घ्या. पावामध्ये काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बीट घाला. यात तुम्ही आवडीनुसार आणखी पदार्थ टाकू शकता.
तुम्ही यात चीज, फ्लेवर वेफर्स टाकून मस्त मसाला सँडविच पावचा आस्वाद घ्या. तुम्ही गरमागरम चहासोबत मसाला सँडविच पावचा आस्वाद घ्या.