Shreya Maskar
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात गाजर येतात. त्यांच्यापासून चवदार लोणचे बनवा. ही रेसिपी झटपट होते.
गाजराचे लोणचे बनवण्यासाठी गाजर, तेल, मोहरी, जिरे, बडीशेप, मेथी, आलं, हळद, लाल तिखट, व्हिनेगर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
गाजराचे लोणचे बनवण्यासाठी गाजर स्वच्छ धुवून त्याची चांगली सालं सोलून घ्या. गाजर पातळ, गोल चकत्यांमध्ये कापून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, बडीशेप आणि मेथी टाकून तडतडू द्या. यात आल्याची पेस्ट टाकून गाजर चांगले परतून घ्या.
गाजराच्या लोणच्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा आणि ५-१० मिनिटे शिजवून घ्या.
शेवटी लोणच्यात व्हिनेगर घालून चांगले मिक्स करा. व्हिनेगरमुळे लोणच्याला छान आंबट चव येते आणि ते जास्त काळ टिकते.
लोणचे थंड झाल्यावर काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवा. जेणेकरून ते खराब होणार नाही आणि चव देखील चांगली राहील.
गाजराचे लोणचे तुम्ही चपाती, पराठा, भाकरी किंवा भाजीसोबत खाऊ शकता. लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडेल.