Shreya Maskar
मेथी ढोकळा बनवण्यासाठी बेसन, रवा, दही, मेथीची पाने, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, मीठ, मसाले इत्यादी साहित्य लागते. फोडणीसाठी तेल, मोहरी, कढीपत्ता, तीळ , हिंग, लिंबाचा रस , साखर , पाणी , इनो इत्यादी साहित्य लागते.
मेथी ढोकळा बनवण्यासाठी बाऊलमध्ये बेसन, रवा, दही, मेथी, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून घ्या.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा. मिश्रण साधारण १५-२० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे ढोकळा हलका आणि मऊ होतो.
ढोकळा वाफवण्यासाठी जे भांडे लागते त्याला तेल लावून तयार मिश्रण मिक्स करा. यात इनो घालून ढोकळ्याचे सारण एकजीव करा.
मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून ढोकळ्याचे भांडे त्यात ठेवा किंवा तुम्ही कुकरमध्ये देखील ढोकळा शिजवू शकता.
20-25 मिनिटांत ढोकळा छान शिजेल. ढोकळ्यात चाकू घातल्यावर तो स्वच्छ बाहेर आला, म्हणजे ढोकळा पूर्ण शिजला आहे.
लहान पॅनमध्ये तेल, मोहरी, तीळ, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. तडक्यात साखर, लिंबाचा रस आणि थोडे पाणी घाला.
वाफवलेला ढोकळ्यावर फोडणी टाकून गरमागरम ढोकळा सर्व्ह करा. लहान मुलांना हा पदार्थ खूप जास्त आवडेल.