Shreya Maskar
भरपूर फायबरसाठी आहाराच लाल माठच्या भाजीचा समावेश करा. यामुळे शरीरात रक्त देखील वाढते. तसेच आरोग्य चांगले राहते.
लाल माठ भाजी बनवण्यासाठी लाल माठ, कांदा, ओलं खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या, बटाटा, तेल, मीठ, धने, जिरे आणि दाण्याचा कूट इत्यादी साहित्य लागते.
लाल माठ भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे, हळद, तेल, मोहरी, धने-जिरे घालून फोडणी तयार करा.
त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बटाट्याच्या फोडी टाकून मिश्रण एकजीव करा. तुम्ही यात उकडलेला किंवा कच्चा बटाटा टाकू शकता.
यात स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिरलेली लाल माठ भाजी आणि थोडा पालक टाकून चांगले परतून घ्या. चवीनुसार मीठ घालून भाजीला एक वाफ येऊ द्या.
भाजीची चव वाढवण्यासाठी ओलं खोबरं, दाण्याचा कूट टाका . दाण्याचा कूट थोडा जाडसर राहू दे. जेणेकरून त्याची चव खाताना येईल.
गरमागरम भाकरी आणि लाल माठ भाजी यांचा आस्वाद घ्या. ही रेसिपी हिवाळ्यात प्रत्येक आठवड्याला बनवा. शरीराला पोषण मिळेल.
लाल माठ कोमट पाण्याने स्वच्छ करा आणि बारीक चिरून घ्या. जेणेकरून त्याचे पोषक घटक चांगले राहतील.