Sheera Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा मऊसूत तुपाचा शिरा, वाचा खास रेसिपी

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात गोड खावंसं वाटत असेल, तर झटपट तुपाचा शिरा बनवा. हा पदार्थ लवकर बनवा आणि खूप चवदार असतो.

Rava Sheera | yandex

तुपाचा शिरा

तुपाचा शिरा बनवण्यासाठी रवा, ड्रायफ्रूट्स, दूध, पाणी, साखर किंवा गूळ, केळ, वेलची पूड, केशर इत्यादी साहित्य लागते.

Rava Sheera | yandex

केशर

तुपाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम केशर गरम दुधामध्ये भिजत घालून ठेवा. यामुळे रव्याला चांगला रंग आणि स्वाद येतो.

Saffron | yandex

तूप

आता गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप टाकून रवा व्यवस्थित भाजून घ्या. रवा हलका गोल्डन झाला की गॅस कमी करा.

Ghee | yandex

केळ

रवा भाजल्यावर त्यात एक केळ कापून टाका. म्हणजे तुपाचा शिरा मस्त प्रसादाचा शिरा बनेल. तुम्ही यात आवडीनुसार अजून पदार्थ टाकू शकता.

Banana | yandex

दूध

त्यानंतर गरम दूध टाकून सतत ढवळत रहा. जेणेकरून शिऱ्याच्या गुठळ्या होणार नाही.

Milk | yandex

गूळ

रवा व्यवस्थित शिजल्यावर त्यात गूळ किंवा साखर घाला. तुम्हाला गोड कमी हवे असेल तर आवर्जून गुळाचा वापर करा.

Jaggery | yandex

वेलची पूड

शेवटी यात वेलची पूड, दुधात घातलेले केशर आणि ड्रायफ्रूट्स टाका आणि २-३ मिनिटांत गॅस बंद करा.

Cardamom powder | yandex

NEXT : हिवाळ्यात सर्दी - खोकल्यापासून राहाल दूर, रोज प्या 'हा' आयुर्वेदिक काढा

Ayurvedic Kadha Recipe | yandex
येथे क्लिक करा...