ms dhoni rohit sharma virat kohli  google
Sports

Rohit Sharma Record: टी -२० मालिकेत हिटमॅनला धोनीचा मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी! या बाबतीत कोहलीलाही सोडणार मागे

India vs Afghanistan T20 Series: आगामी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान या मालिकेत रोहितला मोठे रेकॉर्डस् मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Record News:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात गेल्या १ वर्षांपासून संघाबाहेर असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा कमबॅक करताना दिसून येणार आहेत.

गेल्या काही मालिकांमध्ये हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. मात्र आगामी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान या मालिकेत रोहितला मोठे रेकॉर्डस् मोडून काढण्याची संधी असणार आहे.

रोहित शर्माने टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना ३९ सामने जिंकले आहेत. तर माजी कर्णधार एमएस धोनीने ४१ सामने जिंकले होते. भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. जर भारतीय संघाने हे तिन्ही सामने जिंकले. तर रोहित भारतीय संघासाठी सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरेल.

तसेच त्याला नेतृत्वाच्या बाबतीत विराट कोहलीचा एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. एक कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावे टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची नोंद आहे. विराटने आतापर्यंत १५७० धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने १५२७ धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहितला विराटचा हा मोडण्यासाठी अवघ्या ४४ धावांची गरज आहे. (Latest sports updates)

रोहित शर्मा २००७ टी -२० वर्ल्डकपपासून भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी १४८ टी -२० सामने खेळले आहेत. दरम्यान २ टी -२० सामने खेळताच तो १५० सामने पूर्ण करणार आहे. दरम्यान १५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू ठरू शकतो.

टी -२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा ((कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची टीका

SCROLL FOR NEXT