rohit sharma gets emotional after mi vs srh match video went viral amd2000 twitter
Sports

Rohit Sharma Viral Video: मुंबईच्या विजयानंतर रोहित रडला? ड्रेसिंग रुममधला तो व्हिडिओ व्हायरल

MI vs SRH, Rohit Sharma Viral Video: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यानंतर रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी आणि तुफान फटकेबाजी करत संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. १७४ धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवची १०२ धावांची खेळी निर्णायक ठरली. हा मुंबईचा या हंगामातील चौथा विजय ठरला. दरम्यान या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात रोहित शर्मा रडत असल्याचं दिसून येत आहे.

ड्रेसिंग रुममध्ये रोहितला अश्रू अनावर?

सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तर दुसरीकडे माजी कर्णधार निराश असल्याचं दिसून आलं. रोहितला या सामन्यातही संघाला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. सलामीला येऊन तो अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. ज्यावेळी तो बाज झाला, त्यावेळी तो मान खाली घालून पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना दिसून आला. त्यानंतर रोहितचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात तो निराश असल्याचं दिसून येत आहे. काही युजर्सने तर रोहित रडत असल्याचा दावा केला आहे.

हा व्हिडिओ पाहिला, तर रोहित खरंच रडतोय का याचा अंदाज लावणं कठीण आहे. मात्र व्हिडिओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. काहींचं असं म्हणणं आहे की, रोहित या सामन्यातही मोठी खेळी करु शकला नाही. त्यामुळे तो नाराज आहे.

रोहितला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत तो १२ सामन्यांमध्ये फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यादरम्यान ५ सामन्यांमध्ये त्याला १० पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. तर ३ वेळेस त्याला ३० पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १०५ धावांची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

SCROLL FOR NEXT