rohit sharma
rohit sharma twitter
क्रीडा | T20 WC

Rohit Sharma Statement: 'मला असं वाटलं होतं की, गिल..', रनआऊटबाबत बोलताना रोहित भडकला

Ankush Dhavre

Rohit Sharma Statement In Marathi:

भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी -२० मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. यासह या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या विजयानंतर रोहितने जितेश आणि शिवम दुबेचं कौतुक करत आपल्या रनआऊट बद्दलही भाष्य केलं आहे.

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' वातावरण अतिशय थंड होतं. चेंडू जेव्हा बोटाला लागत होता त्यावेळी खूप वेदना होत होत्या. शेवटी हे खूप सुखद होतं. या सामन्यात आम्हाला अनेक सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. गोलंदाजी करणं खूप कठीण होतं, असं असतानाही आमच्या फिरकी गोलंदाजांनी आणि वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली.' (Cricket News In Marathi)

तसेच आपल्या रनआऊट बद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ' सामन्यात अशा गोष्टी घडत असतात. सर्वांना हेच वाटतं की खेळपट्टीवर राहावं आणि संघासाठी योगदान द्याव. मात्र गोष्टी नेहमीच आपल्याला हव्या तशा नसतात. आम्ही सामना जिंकलोय हे जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटलं होतं की, गिल मैदानावर टिकून राहील आणि मोठी खेळी करेल. मात्र दुर्दैवाने तो बाद होऊन माघारी परतला.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटक अखेर १५८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून शिवम दुबेने सर्वाधिक ६० धावांची खेळी करत भारतीय संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule News: तुतारी चिन्हावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Marathi Live News Updates: मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेला फटका; लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे रेल्वे स्थाकाजवळ थांबवल्या

Remove Odour From Shoes : पावसाळ्यात तुमच्याही शूजमधून कुबट वास येतोय? तर 'हे' उपाय करा...

Jitendra Awhad News: नागालँड केस संदर्भात आव्हाडांची प्रतिक्रिया!

Sharad Pawar Video: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता

SCROLL FOR NEXT