Rohit Sharma Mumbaicha Raja saam tv
Sports

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Rohit Sharma Viral Video : भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईचा राजा म्हणू नका असं सांगत त्यानं घोषणा देणाऱ्या चाहत्यांना शांत केलं.

Nandkumar Joshi

गणपती दर्शनासाठी गेलेल्या रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गणेशाचं दर्शन घेताना चाहत्यांनी मुंबईचा राजा, रोहित शर्मा अशी घोषणाबाजी सुरू केली. पण रोहित शर्माला ते आवडलं नाही. त्यानं घोषणा देणाऱ्यांना रोखलं.

भारताच्या वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. सध्या तरी तो मैदानाबाहेरच आहे. आयपीएल २०२५ नंतर तो एकही सामना खेळलेला नाही. रोहित शर्माने कसोटी आणि त्याआधी टी २० क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मा वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता आहे. मागील दीड वर्षात भारतीय क्रिकेट संघाला दोन आयसीसी स्पर्धांचं विजेतेपद पटकावून देणाऱ्या रोहित शर्मानं मुंबईत गणपतीचं दर्शन घेतलं.

मुंबईतील गणेशोत्सवात रोहित शर्मानं लाडक्या गजाननाचं दर्शन घेतलं. त्यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात रोहित गणरायाचं दर्शन घेताना दिसत आहे. त्यावेळी तिथं असलेल्या चाहत्यांनी मुंबईचा राजा, रोहित शर्मा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मात्र, रोहित शर्मानं तशा प्रकारच्या घोषणा देण्यापासून चाहत्यांना रोखलं.

रोहित शर्माचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातही चाहत्यांकडून मुंबईचा राजा रोहित शर्मा....अशा घोषणा चाहते देत असताना दिसून येत आहे. त्यानंतर रोहित शर्मा कारच्या सनरुफमधून बाहेर आला आणि त्यानं चाहत्यांकडून अभिवादन स्वीकार केलं.

रोहित शर्माला विक्रमाची संधी

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मैदानात उतरल्यानंतर त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होऊ शकते. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९९ सामने खेळले आहेत. एक सामना खेळताच ५०० सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळवेल. जगात आतापर्यंत फक्त १० खेळाडूंनी ५०० किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत.

याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा पूर्ण करण्याची संधीही रोहित शर्माकडे आहे. ४९९ सामन्यांत रोहित शर्मा याने १९७०० धावा केल्या आहेत. ३०० धावा केल्या तर तो २० हजार धावा पूर्ण करणारा जगातील १४ वा फलंदाज ठरणार आहे. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या विराट कोहली आणि जो रूट या दोघांच्या नावावरच २०००० धावा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: अडचणी दूर करण्याची ताकद मिळणार, या राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार

रूपाली चाकणकरला बघतेच; रूपाली ठोंबरेंचा पोलिस ठण्यातच ठिय्या, नेमके काय आहे प्रकरण? VIDEO

Kalyan : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं, १५ दिवसांपूर्वी आली होती बहिणीकडे

Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडवीसांनी काढला थेट आदेश

SCROLL FOR NEXT