rohit sahrma  twitter
क्रीडा

Rohit Sharma Record: सिक्स हिटिंग मशिन!! हिटमॅनने मोडला मोठा रेकॉर्ड;असा कारनामा करणारा ठरलाय पहिलाच फलंदाज

Ankush Dhavre

Rohit Sharma Most Sixes Record:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३७ वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रोहित शर्माने ४० धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. (Rohit Sharma Most Sixes Record)

सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज..

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली होती. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. (Rohit Sharma Record)

त्याने या डावात २४ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. या २ षटकांरासह तो वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. रोहितचा हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २२ वा षटकार ठरला आहे.

या बाबतीत त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे सोडलं आहे. डेव्हिड वॉर्नरने २० षटकार मारले आहेत. तर पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. फखरने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतारपर्यंत १८ षटकार मारले आहेत. (Latest sports updates)

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज..

- रोहित शर्मा - २२ षटकार

- डेव्हिड वॉर्नर - २० षटकार

- फखर जमान - १८ षटकार

- क्विंटन डी कॉक - १८ षटकार

- हेनरिक क्लासेन - १७ षटकार

- मेंडिस - १४ षटकार

- डेव्हिड मिलर - १४ षटकार

- रचिन रविंद्र - १४ षटकार

- डॅरील मिशेल - १३ षटकार

- ग्लेन मॅक्सवेल - १२ षटकार

एकाच वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज..

रोहित शर्माने एकाच वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत एबी डिव्हिलियर्सच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रोहितने या वर्षात आतापर्यंत २३ इनिंगमध्ये ५८ षटकार मारले आहेत. तर डिव्हिलियर्सने २०१५ मध्ये फलंदाजी करताना १८ इनिंगमध्ये ५८ षटकार मारले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT