rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Record: हिटमॅनने रचला इतिहास! सेमिफायनलमध्ये मोठ्या रेकॉर्डवर कोरलं नाव

IND vs ENG, T20 World Cup 2024: भारताचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

इंग्लंडविरुद्ध झालेल्या आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये रोहितची बॅट चांगलीच तळपली. त्याने सलामीला येत ५७ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने अनेक मोठ मोठे रेकॉर्डस मोडून काढले आहेत. भारतीय संघाचा डाव अडचणीत असताना रोहितने महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाची धावसंख्या १७१ धावांवर पोहोचवली. यादरम्यान त्याने विराट कोहली, एमएस धोनी, मोहम्मद अजहरुद्दिन आणि सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

कर्णधार म्हणून ५००० धावा

रोहित शर्माने या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ५७ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने भारतीय कर्णधार म्हणून ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा कारनामा करणारा तो पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने आतापर्यंत भारतीय कर्णधार म्हणून १२२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५०१३ धावा केल्या आहेत.

यापूर्वी हा रेकॉर्ड सौरव गांगुली, विराट कोहली, एमएस धोनी आणि मोहम्मद अजहरुद्दिन यांच्या नावावर होता. या फलंदाजांनी कर्णधार म्हणून ५००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. विराटने २१३ सामन्यांमध्ये १२८८३ धावा केल्या आहेत. तर एमएस धोनीने कर्णधार म्हणून ११२०७ धावा केल्या आहेत. तर सौरव गांगुलीने १९५ सामन्यांमध्ये ७६४३ धावा केल्या होत्या. तर मोहम्मद अजहरुद्दिनने ८०९५ धावा केल्या आहेत.

कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

विराट कोहली: १२८८३ धावा (२१३ सामने)

एमएस धोनी: ११२०७ धावा (३३२ सामने)

मोहम्मद अजहरुद्दीन: ८०९५ धावा (२२१ सामने)

सौरव गांगुली: ७६४३ धावा (१९५ सामने)

रोहित शर्मा: ५०१३ धावा (१२२ सामने)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या १७१ पर्यंत पोहोचवली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT