rohit sharma  Twitter
Sports

Rohit sharma: नाद करा पण आमचा कुठं! नडत असलेल्या स्टार्कला हिटमॅनने वाजवला खणखणीत षटकार -VIDEO

रोहित शर्माने स्टार्कच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS 4th Test Rohit sharma: अहमदाबादच्या मैदानावर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरु आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने देखील चांगली सुरुवात केली आहे.

दरम्यान रोहित शर्माने स्टार्कच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील पहिल्या डावात ४८० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने मिळून ७४ धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहीत शर्मा ३५ धावांवर बाद होऊन माघारी परतला.

रोहित शर्माचा षटकार..

तिसऱ्या दिवसाची सुरुवात होताच, भारतीय संघातील फलंदाजांनी आक्रमण करायला सुरुवात केली. धावांची गती वाढली होती, त्यामुळे स्टीव्ह स्मिथने धावा थांबवण्यासाठी मिचेल स्टार्कला गोलंदाजीसाठी बोलावले.

रणनीती स्पष्ट होती, ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना शॉट बॉलच्या जाळयात अडकवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र शॉट बॉलवर रोहित किती चांगला पूलशॉट मारतो, हे जगजाहीर आहे. मिचेल स्टार्कने शॉट बॉल टाकताच रोहित शर्माने खणखणीत पूल शॉट मारला.

हा शॉट पाहून मिचेल स्टार्क पाहतच राहीला. मात्र त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला. मात्र या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजही टिचून फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

Malpua Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची ईच्छा आहे? मग, झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी मालपुआ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT