rohit sharma yandex
क्रीडा

Rohit Sharma Record: केवळ २ षटकार मारताच हिटमॅन रचणार इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये धोनीला मागे सोडण्याची संधी

Most Sixes In Test Cricket: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माला मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG Test Series, Rohit Sharma Record:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर विशाखापट्टनमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पराभवाचा बदला घेत इंग्लंडवर शानदार विजय मिळवला.

दरम्यान या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

रोहितकडे मोठा रेकॉर्ड करण्याची संधी..

रोहित शर्मा हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वनडे,टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान रेकॉर्ड ब्रेकिंग षटकार देखील मारले आहेत.

राजकोट कसोटीत केवळ २ षटकार मारताच तो कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत एमएस धोनीला मागे सोडणार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७७ षटकार मारले आहेत. तर एमएस धोनीच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ७८ षटकार मारण्याची नोंद आहे. भारतीय संघाकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावे ९१ षटकार मारण्याची नोंद आहे. (Cricket news in marathi)

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत १२८ षटकार मारले आहेत. तर ब्रेंडन मॅक्क्यूलमने १०७ षटकार मारले आहेत. या यादीत विरेंद्र सेहवाग सहाव्या स्थानी आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा १७ व्या क्रमांकावर आहे. तर ४ षटकार मारताच त्याला केविन पीटरसनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज..

विरेंद्र सेहवाग - ९१ षटकार

एमएस धोनी-७८ षटकार

रोहित शर्मा -७७ षटकार

सचिन तेंडुलकर- ६९ षटकार

कपिल देव- ६१ षटकार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT