rohit sharma came forward to help hardik pandya in mi vs rr ipl 2024 match video viral amd2000 twitter
Sports

Rohit Sharma- Hardik Pandya: हार्दिकच्या मदतीला धावला हिटमॅन! वानखेडे स्टेडियमवर नेमकं काय घडलं? पाहा Video

Rohit Sharma Viral Video: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma- Hardik Pandya Viral Video:

हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद स्वीकारल्यापासून जोरदार टीकेचा सामना करावा लागला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात गुजरातकडून, दुसऱ्या सामन्यात हैदराबादकडून आणि आता तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स हार्दिकच्या विरोधात घोषणा देताना दिसून आले. दरम्यान हे सर्व सुरू असताना माजी कर्णधार रोहित शर्माने मन जिंकणारे कृत्य केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यात रोहित शर्मा गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला. त्याला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र क्षेत्ररक्षण करताना त्याने असं काही केलं ज्यामुळे त्याचा दर्जा आणखी उंचावला आहे. ज्यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळी फॅन्स हार्दिकच्या विरोधात घोषणा देत होते. त्यावेळी रोहित शर्मा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने फॅन्सकडे हात दाखवून, हार्दिकच्या विरोधात घोषणा देऊ नका अशा इशारा केला. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Cricket news in marathi)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला रोहित शर्मा फॅन्सला हाताने इशारा करून, त्याच्या विरोधात घोषणा देऊ नका असं सांगताना दिसतोय.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० षटकअखेर केवळ ९ गडी बाद १२५ धावा करता आल्या. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस शून्यावर बाद होऊन माघारी परतले. मुंबईकडून फलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक ३४ धावा केल्या. मुंबईने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT