Rohit sharma  Twitter
Sports

Rohit Sharma: मेहुण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितिकासह धरला ठेका, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल - VIDEO

Rohit sharma viral dance video: संघाबाहेर असलेल्या कर्णधार रोहित शर्माच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Rohit sharma Dance: शुक्रवारी भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील वनडे सामना पार पडला.

या सामन्यात जोरदार कामगिरी करत भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

दरम्यान संघाबाहेर असलेल्या कर्णधार रोहित शर्माच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता. (Latest sports updates)

संघाची घोषणा होताच त्याने पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यावेळी कुठलेही कारण समोर आले होते.

आता त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात तो डान्स करताना दिसून येत आहे.

ऑस्ट्रेलिया विरूध्दचा पहिला वनडे सामना सुरू असताना, रोहित शर्माने आपल्या मेहुण्याच्या लग्नात हजेरी लावली होती. आता लग्न म्हटलं तर डान्स करणं आलंच.

रोहित शर्माही स्वतः ला रोखू शकला नाही. त्याने आपली पत्नी रितिका सह बॅालिवूड गाण्यावर बेधुंद होऊन डान्स केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

पहिल्या वनडेत भारतीय संघाचा विजय..

ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८८ धावांवर रोखला.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून केएल राहूलने नाबाद ७५ तर जडेजाने नाबाद ४५ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Internship Scheme: खुशखबर! तरुणांना चांगल्या कंपनीत इंटर्नशिपची संधी; स्टायपेंडदेखील मिळणार; पीएम इंटर्नशिप योजना आहे तरी काय?

Marathi Actress Saree Photos: हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या, अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य पाहून चंद्रही लाजला...

Maharashtra News Live Update: ऐन लग्नसराईच्या काळात अमरावतीत फुलांचे दर घसरल

Gold Rate Today: युद्ध थांबताच सोन्यानं उच्चांक गाठला, सोनं ३९,८०० रुपयांनी महागलं; २४ अन् २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT