भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करतोय. हा वाढदिवस तो आपल्या कुटुंबासह साजरा करताना दिसून आला आहे. त्याने आपली पत्नी रितिका आणि सूर्यकुमार यादवसोबत मिळून केक कापला. मुंबई इंडियन्स संघाचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी त्याने आपला वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वाढदिवस होणार स्पेशल?
रोहित शर्माला आपला वाढदिवस आणखी स्पेशल करण्याची संधी असणार आहे. कारण मुंबई इंडियन्सचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात तो रिटर्न गिफ्ट म्हणून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. कारण मुंबई इंडियन्सला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
शाळेची फी भरायला पैसे नव्हते..
रोहित शर्मा हा केवळ भारतीय संघाचा नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. मात्र सध्या तो कोट्यावधींचा मालक आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्याची एकूण संपत्ती ही २०० कोटींच्या घरात आहे. रोहित आता कोट्यावधींची कमाई करत असला तरीदेखील एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्याकडे शाळेची फी भरण्यासाठी २७५ रुपयेही नव्हते.
रोहितची कारकीर्द घडविण्यात कोणाचा हात?
माध्यमातील वृत्तानुसार रोहित शर्माची कारकिर्द घडविण्यात दिनेश लाड यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. समर कॅम्पमध्ये रोहित शर्माचा खेळ पाहून दिनेश लाड खूप खुश झाले होते. त्यामुळे त्यांनी रोहितकडे आपण ज्या शाळेत शिकतोय त्या शाळेत प्रवेश घेण्याचा आग्रह केला. रोहित सुरुवातीला आपल्या काका काकूंकडे राहायचा.
रोहितने ही गोष्ट आपल्या काकांना सांगितल्यानंतर त्यांनी नकार दिला होता. कारण रोहित ज्या शाळेत शिकायचा त्या शाळेची फी ३० रुपये होती. दिनेश लाड ज्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी सांगत होते. त्या शाळेची फी २७५ रुपये होती. त्यामुळे त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी दिनेश लाड यांनी शाळेच्या प्रिंसीपलसोबत चर्चा केली आणि त्याला शाळेच्या फीमध्ये सुत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हे प्रयत्न यशस्वी ठरले आणि रोहितला शाळेत प्रवेश मिळाला. इथून रोहितचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.