Rohit Sharma Birthday x
Sports

Rohit Sharma : गरीबीमुळे काकांकडे राहायचा, ऑफ-स्पिनर ते विस्फोटक फलंदाज; वाचा रोहित शर्माचा संघर्ष

Rohit Sharma Birthday : रोहित शर्मा आज (३० एप्रिल) ३८ वर्षांचा झाला आहे. तो सध्या आयपीएल २०२५ मध्ये व्यग्र आहे. ऑफ-स्पिनर ते खतरनाक ओपनर हा प्रवास रोहितच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात...

Yash Shirke

हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्माचा आज (३० एप्रिल) ३८ वा वाढदिवस आहे. जगभरातल्या चाहत्यांकडून, आजी-माजी खेळाडूंकडून रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहे. रोहित सध्या आयपीएल २०२५ मध्ये व्यग्र आहे. मुंबई इंडियन्सने त्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला. कर्णधार असताना पाच आयपीएल ट्रॉफी, एक टी-२० वर्ल्डकप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्माच्या क्रिकेटच्या प्रवासाबद्दलची माहिती आम्ही देणार आहोत.

रोहित शर्माचे आयुष्य लहानपणापासून संघर्षमय होते. क्रिकेटमध्ये स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले आहेत. क्रिकेटसाठी रोहित आईवडिलांपासून लांब काकाच्या घरी राहिला होता. रोहितच्या काकानेच त्याला क्रिकेटच्या अकादमीमध्ये पाठवले होते. नागपूरमध्ये जन्मलेल्या रोहितचे बालपण मुंबईमध्ये गेले.

३० एप्रिल १९८७ रोजी नागपूरमध्ये रोहित शर्माचा जन्म झाला. एका तेलुगू-मराठी भाषी कुटुंबात रोहितचा मोठा झाला. रोहितचे वडिल एका ट्रान्सपोर्ट फर्मच्या गोदामात केअरटेकर म्हणून काम करत होते. वडिलांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने आणि नागपूरमध्ये क्रिकेटसाठी संधी कमी असल्याने रोहित त्याच्या काकाकडे विशाल शर्मा यांच्याकडे राहू लागला. विशाल शर्मा यांनी रोहितला क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश करवून दिला.

रोहित शर्माने ऑफ-स्पिनर म्हणून किक्रेट खेळायला सुरुवात केली. तो ठिकठाक फलंदाजी करायचा. प्रशिक्षक लाड यांनी रोहितची फलंदाजी करण्याची क्षमता ओळखली. तो आधी आठव्या क्रमाकांवर फलंदाजीला जायचा. पण लाड यांनी रोहितला सलामीसाठी पाठवायला सुरुवात केली. रोहितने हॅरिस आणि जाइल्ड शील्ड शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. सलामीवीर म्हणून त्याने पदार्पणातच शतक झळकावले.

मार्च २००५ मध्ये ग्वालेरच्या देवधर ट्रॉफीमध्ये वेस्ट झोनमधून खेळाना रोहितने लिस्ट ए क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. पहिल्या सामन्याच त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद ३१ धावा केल्या. जुलै २००६ मध्ये न्यूझीलंड ए विरुद्ध इंडिया ए या सामन्याद्वारे रोहित शर्माने फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २००६-०७ मध्ये रोहितने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले.

२००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात रोहितने प्रवेश केला. भारत विरुद्ध आयर्लंड सामन्याच्या माध्यमातून वनडे फॉरमॅटमध्ये रोहितने पदार्पण केले. त्याच वर्षी टी-२० फॉरमॅट खेळायला सुरुवात केली. सहा वर्षांनी त्याला टेस्ट सामने खेळायची संधी मिळाली. रोहितने ६७ टेस्ट, २७३ वनडे आणि १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये ४,३०१ धावा, वनडेमध्ये ११,१६८ धावा आणि टी-२० मध्ये ४,३२१ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT