virat kohli with rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma : ' याहून चांगली वेळ असूच शकत नाही..' विराट पाठोपाठ रोहितचा T20I क्रिकेटला अलविदा

Rohit Sharma Retirement: भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहलीने निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली होती. दरम्यान विराट पाठोपाठ रोहितनेही मोठी घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. रोहितने घोषणा करण्यापूर्वीच विराटने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र हे दोघेही खेळाडू वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना दिसून येतील.

सामन्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. तो म्हणाला की, ' हा माझा शेवटचा सामना होता. निवृत्ती घेण्याची याहून चांगली वेळ असू शकत नाही. मला कुठल्याही परिस्थितीत ही ट्रॉफी जिंकायची होती. हा विजय शब्दात मांडणं कठीण आहे. मला हे हवं होतं आणि आम्ही करून दाखवलं. मला खूप आनंद होतोय की आम्ही ही ट्रॉफी जिंकली आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मी माझी कारकीर्द एन्जॉय केली. मी भारतीय संघासाठी माझ्या कारकिर्दीची सुरुवात याच फॉरमॅटमधून केली होती त्यामुळे मला हा कप जिंकायचाच होता.'

रोहित शर्मा हा टी -२० क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे अनेक मोठे रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. त्याच्या टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १५९ सामने खेळले. यादरम्यान त्याला ३२ च्या सरासरीने ४२३१ धावा करता आल्या. यादरम्यान त्याने ३२ अर्धशतक आणि ५ शतक झळकावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT