indian cricket team yandex
क्रीडा

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतूनही रोहित अन् विराटला ब्रेक! कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार?

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघ ५ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. हा दौरा झाल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. ज्यात कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे.

इनसाईडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, जे खेळाडू गेल्या ३ महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहेत, त्यांना विश्रांती दिली जाऊ शकते. ज्यात रोहित शर्माचाही समावेश आहे. रोहित शर्मा डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपासून ते टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपर्यंत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतोय.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाकडून खेळताना दिसून येतील. या स्पर्धेपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका होणार आहे. या मालिकेत खेळाडूंचा चांगलाच सराव होईल. त्यानंतर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हे खेळाडू कसोटी क्रिकेटला प्राधान्य देताना दिसून येतील. कारण सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत भारतीय संघाला १० कसोटी सामने खेळायचे आहेत.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर केव्हा जाणार?

भारतीय संघ जुलै - ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे.

कोण होणार भारतीय संघाचा कर्णधार?

या मालिकेतून रोहित शर्माला विश्रांती दिली जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. दरम्यान रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. कारण आयसीसी टी -२९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

SCROLL FOR NEXT