virat kohli rohit sharma saam tv news
Sports

Team India News: कोहली-रोहित टी-२० वर्ल्डकप खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

ICC T20 World Cup 2024: नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने बाजी मारली.

Ankush Dhavre

Virat Kohli- Rohit Sharma News:

नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने बाजी मारली.

यासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे. केपटाऊनचं मैदान मारत भारतीय संघाने इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ हा दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारा आशियातील पहिलाच संघ ठरला आहे.

दरम्यान भारतीय संघ मायदेशात परतल्यानंतर अफगाणिस्तानविरद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे.

अफगाणिस्तान संघाविरुद्ध करणार दोन हात..

अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेली टी-२० मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली होती.

या मालिकेत सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. मात्र त्याला दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडावं लागलं. तर हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? हा मोठा प्रश्न असणार आहे. (Latest sports updates)

रोहित- विराट करणार कमबॅक?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून टी-२० क्रिकेट खेळताना दिसून आलेले नाही. टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत हे दोघेही आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरले होते.

येत्या काही महिन्यात भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप खेळायचा आहे. ही स्पर्धा पाहता रोहित आणि विराटने मोठा निर्णय घेतला आहे. एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने बीसीसीआयकडे अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ:

शुभमन गिल, इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, रिंकू सिंग, रवी बिश्नोई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT