MI vs CSK saam tv
Sports

MI vs CSK: रोहित शर्मा, एमएस धोनीनंही सराव केला, मैदानावर घाम गाळला; पण दोघेही संघाबाहेरच!

Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्यात रोहित शर्मा आणि एमएस धोनी प्लेइंग ११ मधून बाहेर राहिल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. दुखापतीमुळे दोन्ही दिग्गज खेळाडू आजच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळताना दिसणार नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक रोमांचक सामना रंगला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीम्स मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर आल्या आहेत. या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. याचं कारण म्हणजे रोहित शर्मा विरूद्ध महेंद्रसिंग धोनी असा सामना पाहायला मिळतो.

मात्र सामन्याची प्लेईंग ११ जाहीर होताच चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ११ मधून रोहित शर्माला पुन्हा बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे चेन्नईच्या प्लेईंग ११ मधून महेंद्रसिंग धोनीचं नाव वगळण्यात आलं. त्यामुळे सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रोहित आणि धोनी बाहेर

लीग सुरू होण्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्यामुळे एम.एस. धोनी आयपीएल २०२४ मध्ये एकही सामना खेळलेला नाही. सामना खेळत नसला तरी, धोनीने सराव पुन्हा सुरू केला होता. धोनीला सराव करताना पाहून तो आज मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळू शकेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली. मंगळवारीही धोनीने कसून सराव केला, मात्र आजच्या सामन्यात त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी दिलेली नाही.

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या रोहित शर्माने मंगळवारी सराव केला नाही. त्याच्याशिवाय मुंबई इंडियन्सने दोन सामने खेळले. यामध्ये मुंबईने एक सामना जिंकला, तर एक गमावला. दरम्यान, रोहित शर्मानेही सामन्यापूर्वी सरावामध्ये घाम गाळला होता, तरीही त्याला संधी मिळाली नाहीये.

दोन्ही टीम्सची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स

क्विंटन डी कॉक, नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिस भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर आणि अश्विनी कुमार.

इम्पॅक्ट प्लेअर - विल जॅक्स, राज बावा, शार्दुल ठाकूर, दानिश मालेवार, मयंक मार्कंडे.

चेन्नई सुपर किंग्ज

संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), सरफराज खान, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रुईस, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, मुकेश चौधरी आणि गुरजपनीत सिंग.

इम्पॅक्ट प्लेअर- प्रशांत वीर, मॅथ्यू शॉर्ट, मॅट हेन्री, अकील होसेन, उर्विल पटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT