Rohit's amazing dance saam tv
Sports

Rohit Sharma: 'आज मेरे यार की शादी है’ वर रोहितचा भन्नाट डान्स; नवरा-नवरी आश्चर्यचकीत, Video Viral

Rohit's amazing dance on 'Aaj Mere Yaar Ki Shaadi: भारतीय लग्न समारंभ म्हणजे केवळ विधी आणि जेवण नाही, तर तो धमाल, मस्ती आणि डान्सचा एक अविस्मरणीय सोहळा असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार रोहित शर्माची मजामस्ती जवळपास सर्वांना माहितीये. रोहित केवळ मैदानाच नाही तर मैदानाबाहेरही त्याच्या दिलखुलास स्वभावामुळे सर्व चाहत्याचं मन जिंकून घेतो. असंच सध्या रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा ‘मेरी यार की शादी है’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय.

रोहितच्या या डान्सने त्या लग्नाच्या फोटोशूटदरम्यान उपस्थित सर्वांना आश्चर्यचकित केलं. रोहित मैदानाबाहेरही तितकाच लोकप्रिय आहे, जितका त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या या डान्स मूव्ह्जने नवरा-नवरीही खूश झाले होते. यावेळी त्यांनी 'Yeh Toh Moment Ho Gaya' असं म्हटलंय.

रोहित शर्मा पुन्हा परतला मैदानात

ऑस्ट्रेलिया सिरीजनंतर आता रोहित शर्मा पुन्हा मैदानात परतला असून मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर त्याने सराव सुरू केला आहे. ऑस्ट्रेलिया सिरीजपूर्वी त्याने आपल्या फिटनेसवर भर वजन कमी केलं होतं. आता तो दक्षिण आफ्रिका सिरीजसाठी चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ताज्या वनडे सिरीजमध्ये रोहितने २०२ रन्स करताना १०१.०० च्या सरासरीने खेळ केला होता. त्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक यांचा समावेश होता. २५ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या वनडेमध्ये त्याने शतक झळकावलंय. २९ ऑक्टोबरला शुभमन गिलला मागे टाकत तो जगातील क्रमांक १ वनडे फलंदाज बनलाय.

रोहित शर्मा विक्रमाच्या उंबरठ्यावर

३० नोव्हेंबरपासून रांचीमध्ये सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका सिरीजकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यानंतर ३ डिसेंबरला रायपूर आणि ६ डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये सामना रंगणार आहे. या सिरीजमध्ये रोहित एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. त्याने आतापर्यंत २७६ वनडे सामन्यांमध्ये ३४९ सिक्स ठोकले आहेत. फक्त तीन सिक्सेसची गरज असून तो शाहिद आफ्रिदीचा ३५१ विक्रम मोडून नवा जागतिक विक्रम करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

Crime: तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT