Australian open 2024 Rohan Bopanna  x
Sports

TPL 2024: टेनिस प्रीमियर लीगचा रोमांच आणखी वाढणार! ग्रॅन्ड स्लॅम विजेता खेळाडू झळकणार

Rohan Bopanna In Tennis Premier League: आगामी टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत रोहन बोपन्ना देखील खेळताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

टेनिस प्रीमियर लीगचा सहावा हंगाम आता अगदी जवळ आला आहे. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित खेळाडू रोहन बोपण्णा या मालिकेत सहभागी होणार आहे. डिसेंबरमध्ये ही लीग मुंबईत पार पडणार आहे. बोपण्णा सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे.

टेनिस प्रिमियर लीग स्पर्धेचा सहावा हंगाम सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित खेळाडू रोहन बोपण्णा या मालिकेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेला येत्या डिसेंबर महिन्यात प्रारंभ होणार आहे.

रोहन बोपण्णा हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. हा स्टार टेनिस लीगमध्ये सहभागी होणार आहे. टेनिस खेळात क्रांती घडवून आणण्याचे लीगचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आतापर्यंत टेनिस प्रिमियर लीगचे ५ हंगाम यशस्वी पूर्ण झाले असून, सहाव्या पर्वाची तीव्रता वाढू लागली आहे. भारताचा ४४ वर्षीय बोपण्णाने कारकिर्दीत दोन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदं (२०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी आणि २०१७ मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी) पटकावली आहेत. बोपण्णाला आतापर्यंत ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बंगळुरुचा रहिवासी असलेल्या बोपण्णाने वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविणारा सर्वात वयस्क खेळाडू म्हणून मान मिळविला होता. कारकिर्दीत आतापर्यंत त्याने २५ हून अधिक विजेतीपदे मिळविली आहेत. टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा बोपण्णा लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झानंतर चौथा टेनिसपटू आहे. या चारही भारतीय टेनिसपटूंनी कारकिर्दीत एकतरी ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे.

जवळपास दोन दशकाहून अधिक काळ एटीपी मालिकेचा भाग असलेला बोपण्णा आणि टेनिस प्रिमियर लीगच्या नव्या शैलीत खेळताना दिसणार आहे. सर्व फ्रॅंचाईजी उपांत्य फेरीत पात्र होण्यासाठी प्रत्येकी पाच सामने खेळतील.

लीग क्रांतिकारक अशा २५ गुणांच्या पद्धतीत खेळविली जाणार आहे. दोन फ्रॅंचाईजींच्या सामन्यात पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी सामन्यांचा समावेश असेल. प्रत्येक सामन्यात १००० गुण असतील. प्रत्येक श्रेणीचे मूल्य २५ गुण असेल. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात ५०० गुण (१०० गुण बाय ५ सामने) गुण कमावता येतील. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

अत्यंत अनुभव गाठिशी असलेला बोपण्णा, सुमित नागल, फ्रान्सचा ह्युगो गॅस्टन, अर्मेनियाचा एलिना अवनेसियान या प्रमुख खेळाडूंसह विजेतेपदासाठी प्रयत्ननशील राहिल. लीगचे सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) कोर्टवर होणार आहेत. टेनिस प्रिमियर लीगचा एक भाग होताना मला खूप आनंद झाला आहे. मी खूप रोमांचित आहे. विशेषतः लीगच्या नावीन्यपूर्ण २५ गुणाच्या पद्धतीसह ही लीग तरुण खेळाडूंना आकर्षित करेल, असा मला विश्वास वाटतो, असे रोहन बोपण्णाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT