Roger Federer, Center Court, Wimbledon 2022 Saam Tv
Sports

मी पुन्हा येईन ! राॅजर फेडररनं चाहत्यांना केलं खूष (व्हिडिओ पाहा)

सेंटर काेर्ट मैदानावर आलेल्या राॅजर फेडररने मी आत्ता इथे आनंदी आहे असे म्हटले.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : दिग्गज टेनिसपटू (tennis) रॉजर फेडरर (Roger Federer) याने 'पुन्हा एकदा' विम्बल्डनमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रविवारी फेडररने विम्बल्डनच्या (wimbledon 2022) सेंटर कोर्टवर त्याच काेटच्या शताब्दी वर्षानिमित्तच्या कार्यक्रमासाठी पाऊल ठेवले. परंतु पारंपारिक विम्बल्डनच्या पाेषाखात न येता फेडरर सूटा बूटात आला हाेता. चाहत्यांनी फेडररचे जोरदार स्वागत केले. (Roger Fedrer Latest Marathi News)

यावेळी फेडरर म्हणाला सेंटर कोर्टाने मला खूप काही दिले आहे. काही वेळेला येथे मी सर्वात मोठा विजय मिळविला आहे तर कधी माझे नुकसान देखील झाले आहे आहे. मला आशा आहे की मी पुन्हा एकदा पुनरागमन करू शकेन असेही फेडररने नमूद केले. सन 1998 नंतर दुखापतीमुळे प्रथमच यंदाच्या स्पर्धेतील मुख्य ड्राॅमध्ये फेडररची अनुपस्थिती प्रेक्षकांना जाणवत हाेती. फेडररने शेवटचा सन 2021 मध्ये शेवटची विम्बल्डन स्पर्धा खेळली होती. त्याला उपांत्यपूर्व फेरीत (Hubert Hurkacz) धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्याचे दुसरे शस्त्रक्रिया झाल्याने तो स्पर्धात्मक स्पर्धा खेळला नाही.

मी ही स्पर्धा खूप मिस करीत आहे. मला माहीत होतं की गेल्या वर्षी इथून बाहेर पडणं आणि पुढचं वर्ष खूप कठीण असणार आहे. मला वाटलं नव्हतं की परत यायला खूप वेळ लागेल परंतु गुडघ्याच्या दुखापतीमुळे मी त्रस्त हाेताे. या कोर्टवर मी खूप सामने खेळले आहेत. मी स्वत:ne भाग्यवान समजताे. येथे वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत येणं थाेडे विचित्र वाटतं. इतर सर्व चॅम्पियन्ससोबत इथे येणं खूप छान असल्याचेही फेडररने नमूद केले.

फेडरर पुनरागमन करणार असल्याचे रविवारी त्याच्या चाहत्यांना जाणवले. तो सप्टेंबरमध्ये लेव्हर कप आणि ऑक्टोबरमध्ये बासेल, स्वित्झर्लंड येथे स्विस इनडोअर स्पर्धेत खेळेल अशी शक्यता आहे. त्याने पुन्हा टेनिस खेळण्याची इच्छा सेंटर काेर्टवरुन बाेलून दाखवली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT