Riyan Parag X
Sports

6, 6, 6, 6, 6..6... रियान परागकडून केकेआरची धुलाई, मारले सलग सहा षटकार; दोन वर्षांपूर्वीच ट्वीट होतय व्हायरल

Riyan Parag News : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यामध्ये राजस्थानच्या कर्णधाराने, रियान परागने कमाल केली आहे. त्याने एका ओव्हरमध्ये तब्बल ५ षटकार मारले आहेत.

Yash Shirke

KKR Vs RR IPL 2025 : ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये राजस्थानचा कर्णधार रियान परागने एका ओव्हरमध्ये पाच दमदार षटकार मारले आहेत. या ३० धावांमुळे सामना राजस्थानच्या बाजूला झुकल्याचे पाहायला मिळाले. रियान परागने तेराव्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेल्या मोईन अलीची धुलाई केली. रियानने ४५ चेंडूत ९५ धावा केल्या.

अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि कोलकाता नाईट रायडर्सनी प्रथम फलंदाजी केली. २० ओव्हर्समध्ये केकेआरच्या शिलेदारांनी २०६ धावा केल्या. रहमानुल्लाह गुरबाज ३५ धावा (२५), अंगकृष रघुवंशीने ४४ धावा (३१) आणि आंद्रे रसेलने ५७ (२५) धावा केल्या. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, युधवीर सिंह, महेशा थीक्ष्णा आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक-एक अशा चार विकेट्स घेतल्या.

२०७ धावांचे आव्हान गाठताना आलेला वैभव सूर्यवंशी पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल आणि वानिंदू हसरंगा असे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यानंतर शिमरोन हेटमायरच्या साथीने कर्णधार रियान परागने खिंड लढवली. १२ व्या ओव्हरमध्ये रियान परागने १,६,६,६,६, वाइड, ६ अशा प्रकारे मोईन अलीची धुलाई केली. हा सामन्यातला टर्निंग पॉईंट ठरला असे म्हटले जात आहे. रियान परागने २११ च्या स्ट्राईक रेटने ४५ चेंडूत ९५ धावा केल्या. यात ८ षटकार आणि ६ चौकार यांचा समावेश होता. या खेळीदरम्यान रियान परागचे जुने ट्वीट व्हायरल होत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसल, रमनदीप सिंह, मोईन अली, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

(इम्पॅक्टचे पर्याय - मनीष पांडे, हर्षित राणा, अनुकूल रॉय, रॉवमॅन पॉवेल, लवनीथ सिसोदिया)

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ -

यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोर, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेशा थीक्ष्णा, युधवीर सिंग चरक, आकाश मधवाल

(इम्पॅक्टचे पर्याय - शुभम दुबे, कार्तिकेय सिंह, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, अशोक शर्मा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Uttapam: नाश्त्याला झटपट बनवा उत्तप्पा; सर्वच आवडीने खातील

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

अंतराळात अन्न पचण्यासाठी किती तासांचा कालावधी लागतो?

Naigaon News : वसईमध्ये भयंकर घटना, १० हजार किलो काचेचा ढिग अंगावर कोसळला; २ कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT