अरे यार, काय..! पहिला चेंडू चौकार, नंतर विकेट; बाद होताच १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी हे काय बोलून गेला

Vaibhav Suryavanshi News : ईडन गार्डन्स स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी फक्त ४ धावा करुन माघारी परतला.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi X
Published On

IPL 2025 मधील ५३ वा सामना ईडन गार्डन्स स्टेडिमयवर सुरु आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सच्या शिलेदारांनी २० ओव्हर्समध्ये २०६ धावा केल्या. २०७ धावांचे लक्ष गाठण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी हे राजस्थानचे सलामीवीर मैदानात उतरले. सामन्यात वैभव फक्त ४ धावा करुन माघारी परतला.

गुजरात टायटन्सच्या विरुद्ध सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या १४ वर्षांच्या वैभवने शतकीय खेळी करत इतिहास रचला होता. पण त्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यामध्ये तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर आजच्या केकेआर विरुद्धच्या सामन्यामध्ये वैभव एक चौकार मारुन नंतर बाद झाला, पहिल्याच ओव्हरमध्ये सूर्यवंशी कॅचआउट झाला.

राजस्थानचा वैभव सूर्यवंशी विरुद्ध कोलकाताचा वैभव अरोरा ही लढत आज पाहायला मिळाली. वैभव अरोरा गोलंदाजीची सुरुवात करायला आला. दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जयस्वालने एक धाव घेत स्ट्राईक वैभव सूर्यवंशीकडे दिली. वैभवने तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही त्याने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने वैभवची कॅच पकडली. सलग दुसऱ्यांदा लवकर बाद झाल्यानंतर वैभवच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळाली. विकेटनंतरची वैभवची रिॲक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसल, रमनदीप सिंह, मोईन अली, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

(इम्पॅक्टचे पर्याय - मनीष पांडे, हर्षित राणा, अनुकूल रॉय, रॉवमॅन पॉवेल, लवनीथ सिसोदिया)

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ -

यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोर, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीक्ष्णा, युधवीर सिंग चरक, आकाश मधवाल

(इम्पॅक्टचे पर्याय - शुभम दुबे, कार्तिकेय सिंह, तुषार देशपांडे, व्वेना मफाका, अशोक शर्मा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com