Rishabh Pant May Lead to Ban From One IPL Match Due To Slow Over Rate SAAM TV
Sports

BCCI On Rishabh Pant: दिल्लीला आणखी एक मोठा झटका बसणार; रिषभ पंतवर बंदीची टांगती तलवार

IPL 2024 Marathi News | BCCI May Ban Rishabh Pant's Delhi Capitals: दिल्लीनं ही चूक तिसऱ्यांदा केली तर, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.

Nandkumar Joshi

IPL 2024 News

आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत नवव्या स्थानी घसरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला दुहेरी झटका बसला आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला १०६ धावांनी दारूण पराभव पत्करावा लागला. याशिवाय, स्लो ओव्हर रेटमुळं फक्त कर्णधार रिषभ पंतच नाही, तर संपूर्ण संघालाच लाखो रुपयांचा दंड ठोठावलाय. दिल्लीनं ही चूक दुसऱ्यांदा केली आहे. आता यापुढे अशी चूक केल्यास रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. तसं झालं तर या हादऱ्यातून दिल्लीला सावरणं कठीण होणार आहे.

आयपीएलच्या (IPL 2024) प्रसिद्धीपत्रकानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंतला (Rishabh Pant) दंड ठोठावण्यात आला आहे. विशाखापट्टणमच्या डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानावर कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी ठरवत रिषभ पंतवर ही कारवाई करण्यात आली आहे.

रिषभ पंतवर २४ लाख रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तर इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player) अभिषेक पोरेल याच्यासह दिल्लीच्या ११ पैकी अनेक खेळाडूंकडून सहा लाख रुपये किंवा सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम वसूल केली जाणार आहे.

स्लो ओव्हर रेटशी (slow over rate) संबंधित आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, दिल्ली संघाने ही चूक दुसऱ्यांदा केली होती. त्यामुळे पंतवर २४ लाख रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. आयपीएलच्या या मोसमात तिसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्स संघ स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळला तर, कर्णधार रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.

आयपीएलच्या नियमांनुसार, जर एखाद्या संघाने ही चूक तिसऱ्यांदा केली तर, कर्णधारावर ३० लाख रुपये दंडाची कारवाई आणि एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. तर संघाच्या इतर सदस्यांवर प्रत्येकी १२ लाखांच्या दंडाची कारवाई किंवा सामन्याच्या मानधनाची ५० टक्के रक्कम वसूल केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT