Rishabh Pant statement on defeat against sunrisers in DC vs SRH match amd2000 Twitter
क्रीडा

Rishabh Pant Statement: दिल्लीच्या पराभवाला कारणीभूत कोण? रिषभ पंतने सांगितलं कारण

Ankush Dhavre

होम ग्राऊंडवर दिल्ली कॅपिटल्स संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला ६७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाने २० षटक अखेर २६६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला १९९ धावा करता आल्या. दरम्यान सामन्यानंतर रिषभ पंतने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

या सामन्यानंतर बोलताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत म्हणाला की, ' मला वाटतं की, दव असेल. मात्र असं काहीच झालं नाही. आम्ही त्यांना २२०-२३० धावांवर थांबवलं असतं तर आम्हाला विजयाची संधी होती. पावरप्लेमध्ये त्यांनी १२५ धावा आणि आम्हीही आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या डावात चेंडू थांबून येत होता.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' आम्ही आशा करतो, यापुढे आम्ही विचार करून स्पष्ट मानसिकतेसह मैदानात उतरू. ' या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून जॅक फ्रेजर मॅकगर्कने वादळी अर्धशतकी खेळी केली. या खेळीवर भाष्य करताना रिषभ पंत म्हणाला की, ' त्याने खरंच शानदार फलंदाजी केली. आम्हाला एक संघ म्हणून अशीच कामगिरी करण्याची गरज आहे.'

हैदराबादचा शानदार विजय..

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबा संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड ही जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. ट्रेविस हेडने ८९ धावा चोपल्या.

तर दुसरीकडे अभिषेक शर्माने ताबडतोड ४६ धावांची खेळी केली. शेवटी शाहबाज अहमदने ५९ धावा केल्या. या खेळीच्या बळावर हैदराबादने २० षटकअखेर ७ गडी बाद २६६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून जॅक फ्रेजर मॅकगर्कने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ४४ आणि अभिषेक पोरेलने ४२ धावा चोपल्या. मात्र दिल्लीचा संघ विजयापासून ६७ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT