Rishabh Pant Catch: रिषभ पंतचा सुपरमॅन स्टाईल कॅच! व्हिडिओ पाहून म्हणाल क्या बात.. - Video

Rishabh Pant Catch Video: आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा रिषभ पंत यष्टीमागे तितकाच चपळ आहे. त्याने आतापर्यंत अनेक भन्नाट झेल टिपले आहेत. दरम्यान गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात टिपलेल्या झेलचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Rishabh Pant Catch: रिषभ पंतचा सुपरमॅन स्टाईल कॅच! व्हिडिओ पाहून म्हणाल क्या बात.. - Video
Rishabh Pant Catch: रिषभ पंतचा सुपरमॅन स्टाईल कॅच! व्हिडिओ पाहून म्हणाल क्या बात.. - Videorishabh pant took diving catch during gujarat titans vs delhi capitals match video viral

आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा रिषभ पंत यष्टीमागे तितकाच चपळ आहे. त्याने आतापर्यंत अनेक भन्नाट झेल टिपले आहेत. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने एक भन्नाट झेल टिपला आहे. हा झेल पाहून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले. त्याने टिपलेल्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रिषभ पंतचा सुपरमॅन स्टाईल झेल...

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात डेव्हिड मिलरला बाद करण्यासाठी रिषभ पंतने डाइव्हिंग झेल टिपला. त्याची चपळता पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा झेल त्याने गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी सुरु असताना पाचव्या षटकात घडली.

Rishabh Pant Catch: रिषभ पंतचा सुपरमॅन स्टाईल कॅच! व्हिडिओ पाहून म्हणाल क्या बात.. - Video
PBKS vs MI, IPL 2024: मुंबईविरुद्ध शिखर धवन खेळणार का? कोचने दिली मोठी अपडेट

तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी सुरु असताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ५ वे षटक टाकण्यासाठी ईशांत शर्मा गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर डेव्हिड मिलरने ऑन साईडला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण चेंडू बॅटची कडा घेत मागे गेला. वेगाने येणाऱ्या चेंडूवर पंतनेही झडप घातली आणि हा भन्नाट झेल टिपला. हा शानदार झेल टिपून त्याने डेव्हिड मिलरच्या इनिंगचा शेवट केला.

Rishabh Pant Catch: रिषभ पंतचा सुपरमॅन स्टाईल कॅच! व्हिडिओ पाहून म्हणाल क्या बात.. - Video
GT vs DC,IPL 2024: अवघ्या १६ धावा करुनही रिषभ पंतला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार का दिला? हे आहे कारण

दिल्लीचा शानदार विजय...

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातकडून फलंदाजी करताना राशिद खानने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. त्याला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गुजरात टायटन्स संघाचा संपूर्व डाव अवघ्या ८९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com