Rishabh Pant Kuldeep Yadav saam tv
Sports

Rishabh Pant: ही दोस्ती तुटायची नाय.. बॅटिंग करणाऱ्या कुलदीपला ढकललं, बेल्स उडवल्या, पंतच्या करामतीचा Video पाहाच

Rishabh Pant Kuldeep Yadav video: दिल्लीच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत सामना अनिश्चिततेने भरलेला होता, त्यामुळे दोन्ही संघांवर प्रचंड दडपण होतं. डगआऊटमध्ये तणावाचं वातावरण स्पष्ट दिसत होतं. मात्र, या सगळ्या दडपणाच्या क्षणीही ऋषभ पंत आणि कुलदीप यादव आपल्या मस्तीत असल्याचं पाहायला मिळालं.

Surabhi Jayashree Jagdish

सोमवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात अक्षर पटेलच्या नेतृ्त्वाखाली दिल्लीच्या टीमने विजय मिळवला. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतसाठी नव्या फ्रँचायझीसोबतचा पहिला सामना होता. यावेळी माजी आयपीएल टीमविरुद्ध खेळणारा पंत फलंदाजीमध्ये तसंच विकेटकीपिंगमध्येही फ्लॉप ठरला.

परंतु सामना सुरु असताना पंत नेहमीप्रमाणे मस्तीही करताना दिसला. दरम्यान या हायव्होल्टेज सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा १ विकेटने पराभव केला.

अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा अखेर विजय झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना अतिशय रोमांचक झाला. सामना कोणतंही वळण घेऊ शकत असल्याने दोन्ही टीम्सवर दडपण होतं. दोन्ही डगआऊटमधील वातावरण तणावपूर्ण होतं. मात्र, या सगळ्यादरम्यान भारतीय सहकारी ऋषभ पंत आणि कुलदीप यादव वेगळ्याच मस्तीत दिसले. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ज्यात पंत कुलदीपला धक्का देताना दिसत आहे.

पंतने क्रिझवर दिला कुलदीपला धक्का

रवि बिश्नोई लखनऊकडून 18 वी ओव्हर टाकत होता. कुलदीप यादव या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर बीट झाला. यावेळी हा बॉल विकेटकीपर आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतकडे गेला. त्यावेळी पंतने स्टंपवर बॉल मारण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी तोल जात असतानाही कुलदीपने स्वत:ला क्रीजमध्येच ठेवलं. मात्र यावेळी पंतने गंमतीने त्याला क्रीजमधून बाहेर ढकललं आणि बेल्स उडवून दिल्या. दोघांमधील हा मजेशीर किस्सा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

दिल्लीकडून लखनऊचा विजय

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला. यावेळी अक्षरने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत निकोलस पूरन (७५) आणि मिचेल मार्श (७२) यांनी वादळी खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर एलएसजीने दिल्ली कॅपिटल्सला २१० रन्सचं आव्हान दिलं. खराब सुरुवातीनंतरही दिल्लीला सामना जिंकण्यात यश आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT