Rishabh Pant, T20 World Cup, India Squad  SAAM TV
Sports

कितीही करा चर्चा, हवा तर रिषभ पंतचीच! T20 वर्ल्डकपसाठी 'परफेक्ट', पण आणखी दोघे शर्यतीत

T20 World Cup, India Squad : टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात कोण असेल, कुणाला डच्चू मिळणार, कुणाला संधी मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं काही दिवसांतच सगळ्यांना मिळतील.

Nandkumar Joshi

टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात कोण असेल, कुणाला डच्चू मिळणार, कुणाला संधी मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं काही दिवसांतच सगळ्यांना मिळतील. भारतीय संघाची घोषणा लवकरच होईल. पण संघात प्रमुख विकेटकीपर कोण असेल या चर्चेला आणि शक्यतांना मागील काही दिवसांमधील घडामोडींनी पूर्णविराम दिला आहे.

आयपीएल २०२४ सुरू होण्याआधी प्रमुख विकेटकीपर म्हणून बऱ्याच नावांची चर्चा होती. पण ही नावं आता बरीच मागे पडली आहेत. कारण रिषभ पंतनं पुनरागमन, तेही दणक्यात केल्यानंतर त्याचं संघातलं स्थान जवळपास 'फिक्स' झालं आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या तुफानी खेळीनं तर यावर शिक्कामोर्तबच केलं आहे.

अपघातातून सावरल्यानंतर मैदानात उतरलेला रिषभ पंत अशी कमाल दाखवेल आणि आगामी टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात प्रमुख विकेटकीपर म्हणून प्रबळ दावेदार ठरेल असं आयपीएल सुरू होण्यापूर्वी कुणाच्या ध्यानीमनीही नसेल. २०२२ च्या अखेरच्या महिन्यात त्याच्या कारला भीषण अपघात झाला होता. रिषभ त्यात जखमी झाला होता. त्यामुळं बरेच महिने तो क्रिकेटपासून दूर होता. पंत आयपीएल स्पर्धा सुरू होईपर्यंत तंदुरुस्त होईल की नाही याबाबत शंका होती. जरी तंदुरुस्त झाला तरी, तो मैदानावर उतरेल की नाही याबाबत अनेक प्रश्न होते. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे खुद्द रिषभ पंतनेच आपल्या कामगिरीतून दिली आहेत.

दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यात संघाकडून सर्वोत्तम कामगिरी रिषभ पंतने केली आहे. तो या संघाचा कर्णधारही आहे. पंतने त्याच्या कामगिरीवर उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात तर त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. ४३ चेंडूंत ८८ धावा केल्या. विकेटकीपिंग ही पंतची दुसरी जमेची बाजू आहे. या स्पर्धेत त्यानं स्टम्पच्या मागे जबरदस्त कामगिरी केली आहे. गुजरातविरुद्धच त्यानं दोन जबरदस्त झेल घेतले. कर्णधार म्हणून निर्णयक्षमता आणि स्टम्पमागील चपळता या जोरावर त्यानं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

आयपीएलमध्ये झक्कास कामगिरी

रिषभ पंत आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. पंतने आतापर्यंतच्या ९ सामन्यांत ३४२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १६१ इतका आहे. हा स्ट्राइक रेट मागील तीन मोसमांमधील स्ट्राइक रेटपेक्षा अधिक आहे. २०२२ मध्ये १५१ च्या स्ट्राइक रेटने त्याने ३४० धावा केल्या होत्या. तो एकूण १४ सामने खेळला होता. २०२० मध्येही तो १४ सामने खेळला होता. त्यात त्याने ३४३ धावा केल्या होत्या.

पंतसमोर अजूनही आव्हान

रिषभ पंतसमोर फक्त राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचं आव्हान असेल. त्यानंही आयपीएल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. सॅमसन हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. तर पंत हा चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फॉर्मातल्या फलंदाजाची सध्या गरज आहे. त्यामुळं पतलाच पहिली पसंती असेल, असे दिसतेय. भारतीय संघाच्या चमूत दोन विकेटकीपर असतील. त्यात दुसरा पर्याय म्हणून सॅमसन असेल. पण तिथे सॅमसनला दिनेश कार्तिकचे आव्हान असेल. तो फिनिशर म्हणून भूमिका निभावू शकतो. पण कार्तिक स्टम्पच्या मागे अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळं इथे पुन्हा सॅमसन सरस ठरताना दिसतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT