rishabh pant twitter
क्रीडा

IND vs BAN: रिषभ पंतचं ५२४ दिवसांनंतर कमबॅक; मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर या कारणामुळे सोडावं लागलं मैदान

Rishabh Pant, Ind vs Ban Highlights: रिषभ पंतने तब्बल ५२४ दिवसांनंतर भारतीय संघासाठी कमबॅक केलं.

Ankush Dhavre

भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत मैदानावर परतला आहे. तब्बल ५२४ दिवस क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेल्या रिषभ पंतने भारतीय संघासाठी दमदार कमबॅक केलं. पहिल्याच सामन्यात त्याने ३२ चेंडूंचा सामना करत ५३ धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ४ चौकार खेचले. डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने आपली छाप सोडली आणि दाखवून दिलं की तो भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि रोहित शर्माची जोडी मैदानावर आली. मात्र संजू सॅमसन दुसऱ्याच षटकात बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रिषभ पंत फलंदाजीला आला. संजू सॅमसनला तर संधीचं सोनं करता आलं नाही.

मात्र पंतने मिळालेल्या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार केला. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावं लागलं. कारण हा सराव सामना असल्याने इतर फलंदाजांनाही फलंदाजी करण्याची संधी द्यायची होती.

भारतीय संघाने केल्या १८३ धावा

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या रोहितने २३ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि १ गगनचुंबी षटकार मारला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने देखील वेगवान खेळी करत ३१ धावा चोपल्या. हार्दिक पंड्याचीही बॅट चांगलीच तळपली.

त्याने २३ चेंडूत ४० धावांचं योगदान दिलं. हार्दिकने १७ व्या षटकात तनवीर इस्लामच्या गोलंदाजीवर लागोपाठ ३ षटकार मारले. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला १२२ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना ६० धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT