Rishabh Pant Sunil Gavaskar x
Sports

Ind Vs Eng : मार कोलांटीउडी.. मार कोलांटीउडी.. सुनील गावस्करांनी पव्हिलियनमधून केला इशारा, रिषभ पंतने दिलं भन्नाट उत्तर; Video

Rishabh Pant Sunil Gavaskar : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रिषभ पंतने शतकीय खेळी केली. या सामन्यादरम्यान रिषभ पंत आणि सुनील गावस्कर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng कसोटी सामन्यामध्ये रिषभ पंतने इतिहास रचला आहे. एकाच कसोटी सामन्यामध्ये दोन डावांमध्ये शतकीय खेळी करणारा पंत हा पहिला विकेटकिपर फलंदाज बनला आहे. लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर पंतने ही विक्रमी खेळी केली आहे. पण ११८ धावा केल्यानंतर पंत कॅचआउट झाला. पण जबरदस्त खेळी करत त्याने भारताची धावसंख्या पुढे नेण्यात मदत केली.

पहिल्या डावामध्ये रिषभ पंतने १३४ धावांची झुंजारी खेळी केली होती. शतक ठोकल्यानंतर पंतने कोलांडी उडी मारत सेलिब्रेशन केले. त्यावेळेस सुनील गावस्कर कॉमेंट्री बॉक्समध्ये होते. त्यांनी पंतच्या फलंदाजीचे कौतुक केले. आता दुसऱ्या डावातील शतकीय खेळीच्या वेळीही गावस्कर स्टेडियममध्ये होते. त्यांचा स्टेडियममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्याच्या चौथ्या दिवशी शतक ठोकल्यानंतर सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतला कोलांडी उडी मारुन सेलिब्रेट कर असे म्हटले. हातवारे करत ते पंतला सांगत होते. पण पंतने वेगळ्या पद्धतीने शतकीय खेळी सेलिब्रेट केली. गावस्कर यांनी केलेल्या सेलिब्रेशनच्या विनंतीला मान देत पंतने 'आता सध्या नको.. पुढे नक्की कोलांडी उडी मारेन' असे म्हटले. ही घटना स्टेडियममधील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

दुसऱ्या डावात भारताची फारशी चांगली सुरुवात झाली नाही. सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल फक्त ४ धावा करुन माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शनने ३० धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिल खेळण्यासाठी आला. तो ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी भारताचा डाव पुढे नेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

एसीबीची मोठी कारवाई, BMC च्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, असा रचला सापळा

SCROLL FOR NEXT