Team India in T20 world cup 2026  social media
Sports

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

Rinku Singh leaves Team India due to family emergency : मॅच विनर खेळाडू रिंकू सिंह टीम इंडियाची साथ सोडून अचानक घरी परतला आहे. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तो झिम्बाव्बेविरुद्धचा अत्यंत महत्वाचा सामना खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

Nandkumar Joshi

स्टार फिनिशर रिंकू सिंहने अचानक टीम इंडियाची साथ सोडली आहे. फॅमिली इमर्जन्सीमुळं तो घरी परतला आहे. टीम इंडियाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध २६ फेब्रुवारीला होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रिंकू सिंह याचे वडील खानचंद सिंह यांची प्रकृती बिघडली आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तो पुढील सामना खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

रिंकू सिंह याची टी २० वर्ल्डकपमधील कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही. ५ सामन्यांमध्ये त्याने फक्त २४ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यानं खातंही उघडलं नव्हतं. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रिंकूचे वडील खानचंद सिंह यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ग्रेटर नोएडातील एका स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

रिंकू सिंह सोमवारी, २३ फेब्रुवारीला टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत चेन्नईला गेला होता. २६ फेब्रुवारीला भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सुपर ८ फेरीतील दुसरा महत्वाचा सामना होणार आहे. सूत्रांनुसार, आपल्या वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर रिंकू मंगळवारी सकाळी चेन्नईतून नोएडाला रवाना झाला आहे. रिंकू मंगळवारी संध्याकाळी सरावात देखील सहभागी झाला नव्हता.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला ७६ धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचा सेमिफायनलमध्ये पोहोचण्याच्या मार्ग कठीण झाला आहे. त्यानंतर वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेला मोठ्या धावांच्या फरकाने पराभूत करून टीम इंडियाच्या मार्गात आणखी मोठा अडथळा आणला आहे. टीम इंडियाला सेमिफायनलच्या शर्यतीत राहायचं असेल तर झिम्बाब्वेविरुद्ध केवळ पराभूत करून चालणार नाही. तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वेस्ट इंडीज संघाचा पराभव होणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT