KKR Rinku Singh 5 Balls 5 sixes Video
KKR Rinku Singh 5 Balls 5 sixes Video Saam TV
क्रीडा | IPL

Rinku Singh 5 Sixes : 'रिंकू' वादळाचा गुजरातला तडाखा; सलग ५ चेंडूत ठोकले ५ षटकार, पाहा VIDEO

Satish Daud-Patil

Rinku Singh 5 Balls 5 sixes Video : आयपीएलच्या १६ वा हंगामाचा आजचा पहिला सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात झाला. शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात कोलकात्ता नाईट राईडर्सने गुजरात टायटन्सवर ३ विकेट्सनी थरारक विजय मिळवला.

अखेरच्या ५ चेंडूंत सलग ५ षटकारांची बरसात करत रिंकू सिंग हा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने एकापाठोपाठ एक ५ षटकार लगावले आणि संघाला भन्नाट विजय मिळवून दिला.

अहमदाबाद येथीन नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना केकेआरपुढे २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली होती. सलामी फलंदाज गुरबाज आणि नारायण जगदिशन झटपट बाद झाले.

त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. व्यंकटेश अय्यर ८३ धावा आणि नितेश राणाने ४५ धावांची खेळी केली. वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा दोघेही बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव कोसळळा. त्यांनी एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या. राशिद खान याने हॅट्ट्रिक घेत सामना जवळपास गुजरातच्याच खिशात टाकला होता.

मात्र, त्यानंतर मैदानावर रिंकू सिंग नावाचे वादळ आले. या वादळाने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रिंकूने २१ चेंडूंत झटपट ४८ धावांची वादळी खेळी केली. शेवटच्या षटकात कोलकाता संघाला तब्बल २९ धावांची गरज असताना, रिंकूने सलग पाच चेंडूत पाच षटकार ठोकत विजय मिळवून दिला.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गुजरात संघांची सुरूवात निराशाजनक झाली. कारण वृद्धिमान साहा चौथ्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर मात्र शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यामध्ये चांगलीच जोडी जमली. या दोघांनी यावेळी संघाचे शतक फलकावर लावले. पण शतक झाल्यावर लगेच गिल बाद झाला आणि त्यामुळे गुजरातला दुसरा धक्का बसला.

गिलने यावेळी ३१ चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर ३९ धावांची खेळी साकारली. पण गिल बाद झाला असला तरी साई सुदर्शन मात्र भन्नाट फॉर्मात होता आणि त्याने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले. साईने यावेळी ३८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची दमदार खेळी साकारली. पण साई बाद झाल्यावर शंकरचे वादळ मैदानात आले. विजय शंकरने २४ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ६३ धावांची खेळी साकारली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe Full Speech | 400 पार म्हणणारे तडीपार होणार, अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Today's Marathi News Live : होर्डिंग दुर्घटना : मुंबई महापालिका आयुक्त गगराणी घटनास्थळी

Mamata Banerjee: 'इंडिया आघाडीचं केंद्रात सरकार आल्यास बाहेरून पाठिंबा देऊ...'; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची महत्वाची घोषणा

Maharashtra Local Bodies Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेला होणार सुनावणी

Chhatrapati Sambhajinagar: घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग! २१ वर्षानंतर शहरातील होर्डिंगसह इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

SCROLL FOR NEXT