replacement announced in mumbai indians squad kwena maphaka replaced dilshan madhushana cricket news in marathi  yandex
क्रीडा

Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढली! रिप्लेसमेंट म्हणून रबाडाची पलटणमध्ये एन्ट्री

Replacement In Mumbai Indians Squad: २४ मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा संघ आमने सामने येणार आहे.

Ankush Dhavre

Kwena Maphaka In Mumbai Indians:

आयपीएल २०२४ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे. तर २४ मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा संघ आमने सामने येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबईच्या ताफ्यात रिप्लेसमेंट म्हणून ज्युनिअर रबाडाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मुबंईच्या गोलंदाजी क्रमाची धार आणखी वाढणार आहे.

आयपीएल तोंडावर असूनही खेळाडूंचं दुखापतीचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच मुंबईचा गोलंदाज दिलशान मदुशंका आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून ज्युनिअर रबाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्वेना मफाकाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या क्वेना मफाकाने काही दिवसांपूर्वी झालेल्या आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. त्याच्या शानदार कामगिरीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. दरम्यान या कामगिरीनंतर त्याची तुलना थेट कगिसो रबाडासोबत केली जाऊ लागली होती. त्याने आपल्या अचूक लाईन आणि लेंथने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

मुंबई - गुजरातमध्ये रंगणार सामना...

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरद्ध होणार आहे. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना असणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. गेल्या हंगामात गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या यावेळी मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर दुसरीकडे शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. हे दोन्ही खेळाडू गेल्या वर्षी एकाच संघात होते. मात्र आता एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येणार आहेत. (Cricket news in marathi)

आगामी हंगामासाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहाल वढेरा, शम्स मुलानी, विष्णु विनोद, पियुष चावला, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, क्वेना मफाका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT