IPL 2024: मुंबईची पलटण तयार! रोहित - बुमराहसह हे ५ खेळाडू मैदान गाजवणार

Mumbai Indians Players To Watch Out: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आयपीएल २०२४ स्पर्धा येत्या २२ मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना येत्या २४ मार्चपासून गुजरात टायटन्स संघासोबत रंगणार आहे.
top 5 players to watch out in mumbai indians squad for ipl 2024 rohit sharma jasprit bumrah suryakumar yadav hardik pandya
top 5 players to watch out in mumbai indians squad for ipl 2024 rohit sharma jasprit bumrah suryakumar yadav hardik pandyayandex
Published On

Mumbai Indians, IPL 2024:

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आयपीएल २०२४ स्पर्धा येत्या २२ मार्चपासून सुरु होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना येत्या २४ मार्चपासून गुजरात टायटन्स संघासोबत रंगणार आहे. गतवर्षी गुजरातचं नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या यावेळी मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. ५ वेळेस आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा मुंबईचा संघ आगामी हंगामासाठी सज्ज झाला आहे.

रोहित शर्मा

मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा आगामी हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. रोहित सध्या तुफान फॉर्ममध्ये असून आयपीएल स्पर्धेतही तो धावांचा पाऊस पाडू शकतो. रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज असून आयपीएल स्पर्धेतही सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. (Cricket news in marathi)

top 5 players to watch out in mumbai indians squad for ipl 2024 rohit sharma jasprit bumrah suryakumar yadav hardik pandya
IPL 2024: रोहित-हार्दिकमध्ये का रे दुरावा? व्हायरल फोटोमुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा

सूर्यकुमार यादव.

सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज आहे. मुंबईचा हा आक्रमक फलंदाज आपल्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या नावे ३२४९ धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने १ शतक देखील झळकावलं आहे. जर त्याची बॅट तळपली तर मुंबईने जेतेपदाचा षटकार मारु शकते.

top 5 players to watch out in mumbai indians squad for ipl 2024 rohit sharma jasprit bumrah suryakumar yadav hardik pandya
WPL Final 2024: 'आता ए साला कप नामदू म्हणायचं...',RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर स्मृती मंधानाचा फॅन्सला खास मेसेज

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. हार्दिक पंड्याला आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवायचं असेल तर या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २३०९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ५३ गडी बाद केले आहेत. इतकेच नव्हे तर त्याने पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं होतं.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह देखील आयपीएल स्पर्धेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेतून त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागलं होतं. त्याच्या कमबॅकमुळे मुंबईच्या संघाची ताकद दुपटीने वाढली आहे. बुमराहने आयपीएल कारकिर्दीत १४५ गडी बाद केले आहेत. जर बुमराहची जादू चालली तर मुंबईचा संघ या हंगामातही जेतेपद जिंकू शकतो.

इशान किशन

गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला इशान किशन आयपीएल स्पर्धेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. गेल्या हंगामात त्याने ४५४ धावा ठोकल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com