IND VS WI 1st Test R Ashwin Records: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला आहे.
यासह कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना आर अश्विनने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ७ गडी बाद केले आहेत. यासह त्याने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
अश्विनने पाडला विक्रमांचा पाऊस..
आर अश्विनने पहिल्या डावात ६० धावा खर्च करत ५ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात ७१ धावा खर्च करत ७ गडी बाद केले. अशाप्रकारे दोन्ही डावात मिळून त्याने अश्विनने ३४ व्या वेळेस ५ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात १३१ धावा खर्च करत १२ गडी बाद केले आहेत. ही त्याची परदेशात कसोटी क्रिकेट खेळताना केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. तर भारतीय गोलंदाजाकडून परदेशात केलेली तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.
आर अश्विनने आठव्यांदा १० किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. भारतीय संघाकडून केवळ अनिल कुंबळे असा कारनामा करू शकले आहेत. आता आर अश्विनकडे अनिल कुंबळेंना देखील मागे सोडण्याची संधी आहे. (Latest sports updates)
कसोटी सामन्यातील दोन्ही डावात सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे गोलंदाज..
मुथय्या मुरलीधरन- ११ वेळेस
रंगना हेराथ - ८ वेळेस
सिडनी बार्न्स- ६ वेळेस
आर अश्विन - ६ वेळेस
भारत - वेस्टइंडीज कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज..
कपिल देव- ८९
मेल्कम मार्शल - ७६
अनिल कुंबळे- ७६
आर अश्विन- ७४
श्रीनिवास वेंकटराघवन- ६८
भारत - वेस्टइंडीज कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारे गोलंदाज..
मेल्कम मार्शल- ६
आर अश्विन -६
हरभजन सिंग - ५
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.