Shubman Gill: शुबमन गिल तिसऱ्या स्थानी सपशेल फेल! बॅटिंगमध्ये एकमेव पण महत्वाचा बदल करण्याचा दिग्गजानं दिला सल्ला

Aakash Chopra On Shubman Gill: वेस्टइंडीजविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला आहे.
shubman gill
shubman gillsaam tv
Published On

IND vs WI 1st Test: वेस्टइंडीजविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला आहे. अवघ्या ६ धावांवर फलंदाजी करत असताना तो, जोमेल वरिकनच्या चेंडूवर बाद होउन माघारी परतला आहे.

दरम्यान स्वस्तात बाद होताच माजी भारतीय भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने आपली प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

shubman gill
Yashasvi Jaiswal Records: गावसकर अन् सेहवागलाही नाही जमलं ते यशस्वीने करून दाखवलं! असा कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज

शुभमन गिल कुठे कमी पडतोय ?

शुबमन गिलच्या टेक्निकबद्दल बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, 'शुबमन गिल डिफेन्सिव्ह शॉट हलक्या हाताने खेळत नाही. त्यामुळेच तो सातत्याने लवकर बाद होतोय. भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं हे मुळीच सोपं नाही.

हे शुबमन गिलला देखील माहित आहे. आतापर्यंत तो डावाची सुरुवात करायचा. आता तिसऱ्या क्रमांकावर सेट व्हायला वेळ लागेल. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी बराच वेळ फलंदाजी केली .

त्यामुळे शुबमनला फलंदाजीसाठी वाट पाहावी लागली. मला असं वाटतं की, त्याची टेक्निक आणखी चांगली होऊ शकली असती.'

गिल उत्तम फलंदाज आहे, पण..

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, 'तुम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली इंदूर कसोटी लक्षात असेलच. त्या सामन्यात देखील शुभमन गिल याच पद्धतीने बाद होऊन माघारी परतला होता. शुभमन गिलने घट्ट हाताने बॅट पकडून डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. या नादात त्याने विकेट गमावला.शुबमनला या शॉटवर मेहनत घ्यावी लागेल. प्रामुख्याने कसोटी फॉरमॅटमध्ये मात्र तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे यात काहीच शंका नाही.' (Latest sports updates)

shubman gill
Virat Kohli Dance Video: चौकार मारताच विराटने केला डान्स! हटके सेलिब्रेशन करण्यामागचं कारण काय? पाहा VIDEO

पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा दबदबा कायम..

डॉमिनिका कसोटीच्या दुसऱ्या दिवशी देखील भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी २५६ धावांची विक्रमी भागीदारी केली.

यासह दोघांनी आपलं शतक पूर्ण केलं. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक झळकावले. तर यशस्वीने पदार्पणाच्या सामन्यात शतक पूर्ण केलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत २ गडी बाद ३१२ धावा करत १६२ धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com