team india  saam tv
Sports

Reasons Behind Team India Defeat: कुठे गमावली टीम इंडियाने मॅच? वाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवाची प्रमुख कारणं..

IND VS AUS WTC Final 2023: जाणून घ्या काय आहे भारतीय संघाच्या पराभवाची प्रमुख कारणे.

Ankush Dhavre

IND VS AUS: लंडनमधील केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

मात्र शेवटी ऑस्ट्रेलियाने बाजी मारत जोरदार विजय मिळवला. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान या पराभवानंतर जाणून घ्या काय आहे भारतीय संघाच्या पराभवाची प्रमुख कारणे.

पहिल्या डावात पार्टनरशिप तोडण्यात भारतीय गोलंदाज ठरले अपयशी:

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला ३ धक्के दिले होते.

मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवता आली नाही. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने मोठी भागीदारी केली. दोघांनी शतक झळकावले होते. ही जोडी फोडण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४६९ धावांचा डोंगर उभारला होता.

टॉप ऑर्डरची निराशाजनक कामगिरी:

या सामन्यात भारतीय टॉप ऑर्डरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र संघातील प्रमुख फलंदाज हवी तशी कामगिरी करू शकले नाही. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या डावात १३ तर दुसऱ्या डावात अवघ्या ४३ धावा करत माघारी परतला.

तर शुभमन गिल पहिल्या डावात १३ आणि दुसऱ्या आणि अवघ्या १८ धावा करत माघारी परतला. तसेच संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. मात्र या सामन्यात तो नावाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याला या सामन्यातील पहिल्या डावात १४ तर दुसऱ्या डावात अवघ्या २७ धावा करता आल्या. (Latest sports updates)

रिषभ पंतची कमी जाणवली:

रिषभ पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये मॅच विनर खेळाडू आहे. त्याने आपल्या संघाला अनेकदा अडचणीतून बाहेर काढत संघाला विजय मिळवून दिला आहे. या सामन्यात त्याची कमतरता जाणवली. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरतला संधी दिली गेली होती.

मात्र तो या संधीचा पुरेपूर लाभ घेऊ शकला नाही. यष्टीमागे त्याने दमदार कामगिरी केली. मात्र फलंदाजीत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात २३ धावा केल्या. त्याच्या ऐवजी पर्यायी खेळाडू म्हणून ईशान किशनचं पुढे येत होतं.

ईशान किशन हा डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज आहे. तो शेवटी येऊन आक्रमक फलंदाजी करू शकला असता.

ऑरेंज कॅप, पर्पल कॅप होल्डर्सची फ्लॉप कामगिरी..

आयपीएल २०२३ स्पर्धेत शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांनी दमदार कामगिरी केली होती. सर्वाधिक धावा करणाऱ्या शुभमन गिलने या स्पर्धेत ऑरेंज कॅप पटकावली होती. तर सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या मोहम्मद शमीने या स्पर्धेत पर्पल कॅप पटकावली होती.

मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोघांनाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. शुभमन गिलने अवघ्या ३१ धावा केल्या. तर मोहम्मद शमीला दोन्ही डावात मिळून अवघ्या ४ गडी बाद करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिंदेसेनेला मोठा धक्का; महिला पदाधिकाऱ्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'; हाती घेतलं कमळ

नाले स्वच्छ केलं की कचरा काढला, पाच वर्षात काय केलं; भाजपच्या माजी नगरसेवकाला नागरिकांनी घेरलं|VIDEO

Maharashtra Live News Update: चंद्रपूरमध्ये भाजपचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवले

Bracelet Mangalsutra Designs: ब्रेसलेट मंगळसूत्राच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेच्या हातावर शोभून दिसतील

Toast Recipe : नाश्त्याला चहासोबत खाण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत टोस्ट, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT