IND VS AUS WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत भारतीय संघाला पराभूत केलं आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ४४४ धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. विराट कोहली ४९ धावांवर बाद होऊन माघारी परतला होता.
विराट कोहलीचं अर्धशतक हुकलं..
भारतीय संघ जेव्हा चौथ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी उतरला, त्यावेळी विराट अर्धशतकाच्या अगदी जवळ होता. त्यामुळे असं वाटलं होतं की, विराट कोहली अर्धशतक झळकावल्यानंतर मोठी खेळी करेल.
मात्र स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे. विराटने या डावात ७८ चेंडूंचा सामना करत ४९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार मारले.
स्टीव्ह स्मिथचा भन्नाट कॅच..
तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाकडून स्कॉट बोलँड गोलंदाजीला आला होता. या षटकातील सुरुवातीच्या २ चेंडूंवर त्याने विराटला अडचणीत आणलं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने विराटची विकेट मिळवली. या षटकातील तिसरा चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला.
ज्यावर विराट कोहलीने कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला. कारण चेंडू बॅटची कडा घेत स्लिपमध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या हातात गेला.
स्टीव्ह स्मिथने कुठलीही चूक न करता डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)
विराट आणि अजिंक्य रहाणेची अर्धशतकी भागीदारी..
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४४४ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र शुभमन गिल १८ धावा करत माघारी परतला.
त्यानंतर रोहितने देखील ४३ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने २७ धावा करत माघारी परतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने अर्धशतकी भागीदारी केली आणि चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.