IND vs AUS WTC Final 2023: आज 99 टक्के पावसाचा अंदाज, पाऊस पडल्यास सामन्याचं काय होणार?

Sports News : लंडनमध्ये आज म्हणजेच 11 जून रोजी हवामान खराब असण्याचा अंदाज आहे.
INDIA
INDIA ICC Twitter
Published On

India vs Australia WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु आहे. आज सामन्याच्या पाचवा आणि निर्णायक दिवस आहे. टीम इंडिया समोर 444 धावांचं मोठं लक्ष्य ऑस्ट्रेलियांने ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 3 विकेट्स गमावत 164 धावा केल्या.

आज पाचव्या दिवशी भारतीय संघ 164 धावांच्या पुढे डावाची सुरुवात करेल. विराट कोहली 44 धावांवर आणि अजिंक्य रहाणे 20 धावांवर मैदानात तळ ठोकून आहेत. सामन्यात विजयासाठी भारताला अजूनही 280 धावांची गरज आहे. (Latest sports updates)

INDIA
WATCH WTC Final 2023: एकाच चेंडूवर पडली गिल- पुजाराची विकेट; पाहा VIDEO

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सामन्यावर आज पावसाचं सावट आहे. लंडनमध्ये आज म्हणजेच 11 जून रोजी हवामान खराब असण्याचा अंदाज आहे. Accuweatherनुसार आज पाऊस होण्याची शक्यता 99 टक्के आहे. त्यामुळे पाऊस पाचव्या दिवसाचा खेळ बिघडवणार हे जवळपास फिक्स आहे.

लंडनमधील हवामान

  • कमाल तापमान - 27 अंश सेल्सिअस

  • किमान तापमान - 17 अंश सेल्सिअस

  • पावसाची शक्यता - 99 टक्के

  • ढगाळ वातावरण - 55 टक्के

  • हवेची गती- 29 किमी प्रति तास

INDIA
Shardul Thakur Batting: संघात का घेतलं म्हणून टोकलं; त्याच लॉर्ड शार्दुलने कांगारूंना ठोकलं...

राखीव दिवशीही पाऊस पडला तर...

पाचव्या दिवशी एक तासाहून अधिक वेळ पाऊस पडला तर सामना राखीव दिवसात खेळवला जाईल. म्हणजे पाचव्या दिवसाचा खेळ 12 जून रोजी सोमवारी सुरु होईल.

मात्र राखीव दिवशी देखील पावसाने हजेरी लावली तर सामना ड्रॉ केला जाईल. सामन्या अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल. त्यानुसार दोन्ही संघ चॅम्पियन ठरतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com